Powered By Blogger

04 September, 2011

भ्रष्टाचाराविरुद्ध लस तयार करण्याची गरज


आज आपल्या भारत देशात हाफकिन Institute ,भाभा Institute ,सारख्य्या नामवंत संस्था कडून अनेक प्रकारच्या साथीच्या रोगांवर लस तयार केली जाते ज्यामुळे अश्या लसिद्वारे अनेक प्रकारच्या रोगप्रतिकारक जंतूंची आपल्या शरीरात निर्मिती केली जाते आणि हे लासिद्वारे शरीरात inject केलेले जंतू आपल्या शरीरात असलेल्या अनेक प्रकारच्या रोगांच्या जंतुना मारून टाकतात आणि त्यामुळे रोगांचे समूळ उच्चाटन होते आणि मनुष्य रोगमुक्त होतो.
आज आपल्या देशात भ्रष्टाचार या रोगाची लागण फार मोठ्ठ्या प्रमाणात झाली असून या भ्रष्टाचाराच्या रोगावर प्रतिकारक लस शोधणे अत्यंत गरजेचे झाले आहें. देशातील सर्व नामवंत संस्थामधील सर्व शास्त्रज्ञांना सरकारने स्पेशल आदेश देवून VACCINE AGAINST CORRUPTION हि लस शोधून तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे.
हि लस तयार केल्यानंतर देश पातळीवर लसीकरण मोहीम राबवावी. जसे पोलिओ लसीकरण देशपातळीवर सर्वत्र राबविले जाते,तसे स्वरूप या लसीकरणाचे असावे.देशातील सर्व सरकारी कर्मचारी ( शिपायापासून ते पंतप्रधानापर्यंत आणि न्यायाधीशांपासून ते आमदार खासदारांपर्यंत आणि नगरसेवकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत ) या सर्वाना हि लस टोचण्यात यावी जेणेकरून भ्रष्टाचाराचे सर्व जंतू कायमचे नष्ट होण्यास मदत होईल.या लसिमद्धे समाविष्ट असलेल्या जन्तुन्मद्धे असा गुणधर्म असावा कि ज्याप्रमाणे संगणक व्हायरस घुसल्यावर जसे त्यातील फायली नष्ट करतो आणि संगणक जाम होतो त्याप्रमाणे जर कोणी भ्रष्टाचारी व्यक्ती गैरव्यहाराद्वारे काही रक्कम स्वीकारीत असेल तर त्यावेळी त्या व्यक्तीचा मेंदू जाम करण्याची क्षमता या vaccine मद्धे असावी. या लसी च्या शोधामुळे जगभरात भ्रष्टाचारामुळे भारताची खराब झालेली प्रतिमा सुधारण्यास खूप मदत होईल आणि समाजातील सर्व स्तरातील नागरिक समाधानाचा श्वास घेतील.
महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी
संचालक,श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक ली.
बसमतनगर जी.हिगोली.
E-mail -mvkapuskari@gmail.com

28 August, 2011

हि कसली समानता ?


महाराष्ट्रात पोळा हा सन शेतकऱ्याच्या दृष्टीने एक महत्वाचा सन म्हणून साजरा केला जातो.या सणाच्या दिवशी बैलांची पूजा करून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यापूर्व कालापासून चालत आलेली एक अनिष्ट प्रथा मनाला खटकते.ती म्हणजे मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा मान म्हणून त्या त्या गावातील पोलीस पाटील किंवा जो कोणी पूर्वापार मानकरी असेल त्याला दिला जातो व जोपर्यंत त्याचे बैल प्रदक्षिणा घालणार नाहीत तोपर्यंत इतर कोणाचेही बैल प्रदक्षिणा घालू शकत नाहीत.
मानकरी त्या दिवशी मुद्दामच बैल उशिरा वाजत गाजत व जागोजागी थांबत मंदिरात येतात आणि तोपर्यंत इतर शेतकरी बिचारे ताटकळत बसतात.या सर्व प्रकारामाद्धे आश्चर्याची गोष्ट म्हणजे मानाकार्याच्याच बैल्जोडीने पहिल्यांदा प्रदक्षिणा घालावी म्हणून बंदोबस्तात त्या दिवशी मुद्दाम वाढ केली जाते व अनेक खेद्यांमाद्धे हा प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून अनेकवेळा मारामारी होते व याकामी शासनाचे बंदोबस्तासाठी लाखो रुपये खर्च होतात .पण हि कसली समानता ? लोकशाहीतील नीतीमूल्यांची फसवणूक व दुर्बल आणि असंघटीत श्त्कार्यांची अक्षरश: कुचंबणा नव्हे काय ?
आज लोकशाही असलेल्या या भारत देशात अण्णा हजारे सारख्या ७४ वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्तीला १३ दिवस उपोषण केल्यावर कुठे शासनाला जाग आली आणि हा घोर संघर्ष यशस्वी झाला.दुक:ख असे आहें कि अशा अनिष्ट प्रथा जोपासण्यासाठी शासकीय बळ वापरले जाते तेथे समानतेची अपेक्षा बिचार्या शेतकऱ्यांनी काय म्हणून करावी ?
महादेव विश्वनाथ कापुसकरी
बसमथ नगर जी. हिंगोली.
मो.9423141008

15 August, 2011

लोकपाल बिलासाठी अण्णांचे उपोषण

उद्या दि.१६-०८-२०११ पासून सुरु होणार्या अण्णांच्या उपोषणाला दिलेली परवानगी सरकारने नाकारल्याचे वाचूनअतिशय खेद वाटला आणि सरकारचा हा दुर्दैवी निर्णय म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणावे लागेल. हजारोकोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून वर अशी दडपशाही जर हे सरकार करत असेल तर नक्कीच जयद्रथाचे काय झालेतसे ह्या मुजोर सरकारचे होणार आहें असे दिसते.एकीकडे भयंकर महागाईचे दुष्टचक्र,शेतकऱ्यांच्या गरजाभागविण्यास सरकारची असमर्थता आणि खते व बियाण्यासाठी मिळविण्यासाठी ची त्यांची केविलवाणी धडपडआणि वरून पळणार्या निष्पाप शेतकर्याना पाठीत बंदुकीच्या गोळ्या हे चित्र अत्यंत विदारक आणिसर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारे आहें.
anaa जे काम करीत आहेत ते काम खरे तर विरोधी पक्षाचे आहें पण अक्षरश: षंढ झाला आहें भरत देशातीलविरोधी पक्ष .
चार शेतकरी मृत्यू पावले ,कोणते नेते त्यांच्या नातेवाईकाना भेटले?
केंद्रीय कृषिमंत्री महाराष्ट्राचे आहेत त्यांचे कर्तव्य नव्हते?
पाच लाख नाही दहा लाख जरी दिले तरीही त्यांच्या कुटुंबियांच्या वेदना,दुक्ख: तसूभरही कमी होवू शकत नाहीत.
अण्णा जे काही करत आहेत ते सर्व जनतेच्या प्रातिनिधिक स्वरूपात आहें त्यामुळे सरकारने असे मुळीच समजूनये कि जसे रामदेव बाबांचे आंदोलन दडपले तसे अन्नांचेही दडपता येयील.
ज्वालामुखी प्रमाणे उसळी मारून उद्रेक बाहेर आल्यावर काय परिणाम होवू शकतो याचा विचार सरकारने सारासारबुद्धीने करावा असे वाटते.

महादेव विश्वनाथ कापुसकरी
बसमथ
नगर जी. हिंगोली.
मो. 9423141008

30 July, 2011

भारतरत्न पुरस्कार आणि सचिन तेंडूलकर

सचिन ला इतक्यातच भारतरत्न पुरस्कार देणे योग्य आहें का? हा प्रश्न आपण उचलला याबद्दल आपले अभिनंदन.
कारण कि मनातून कितीही वाटत असले तरीही याबाबत असलेल्या राजकीय दबावामुळे आणि भीती पोटी कोणीहीबोलायला तयार नाही.
खरे तर क्रिकेट हा खेळ भारतीय प्रेक्षकांनी वाजवीपेक्षा जास्त लोकप्रिय केला आहें हे माझे मत.
या खेळात प्रसिद्धी आणि पैसा दोन्हींचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त आहें.
त्यामानाने जागतिक पातळीवरील प्रथम क्रमांकाचे गुणांकन मिळालेले विश्वनाथन आनंद ,गीत सेठी,हॉकी तीलध्यानचंद,या लोकाना घ्यायला देखील विमानतळावर कोणी जात नाही आणि क्रिकेट चे खेळाडू मात्र इतके लाडकेकि पोलीस बंदोबस्तात आणि पत्रकारांच्या गराड्यात ,दूरदर्शन चे क्यामेरे आणि त्यांचे खटाखट flash हे कितीविसंगत आणि इतर खेळांवर अन्याय करणारे नव्हे काय?
जेव्हा सचिनला भारतरत्न देण्याविषयी चर्चा होते तेव्हा काय वाटत असेल विश्वनाथन आनंदला ?
मी तर असे म्हणेन कि हे सर्व सचिन ने स्वत: होवून थांबवायला हवे आणि नम्रपणे हा पुरस्कार मला देवू नये असेसांगायला हवे.
सचिन ची कामगिरी खूप मोठी आहें आणि देशासाठी त्याचे योगदान मोठे आहें यात कसलेही दुमत नाही.पणभारतरत्न हा पुरस्कार काही लहान नाही.कि इतक्या सहजपणे आणि मुद्दाम एका व्यक्तीसाठी घटनेत दुरुस्ती करूनइतकी घाई करून गडबडीने पुरस्कार देण्याचा घाट घातला जातोय.
मला असे वाटते कि घटनाच बदलायची असेल तर कसाब ला फाशी देण्यासाठी बदला ,भ्रष्टाचार करणारया राजकीयआणि बड्या पांढरपेशा गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी बदला.कलमाडी सारखे नेते डॉक्टर आणि बडे वकील यांच्यासाह्याने स्मृतीभांश झाल्याचे नाटक करीत आहें आणि बिचारी भारतीय जनता निर्विकार पने हे सर्व प्रकार ऐकूनघेतेय.येथे घटना का बदलत नाहीत?
करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराने बरबटलेले k .राजा,कानिमोझी सारख्या नेत्यांना फासावर चढविण्यासाठी घटनाबदला.
खरोखरच सामान्य जनता आनंदित होईल.आणि हे सर्व करण्यासाठी घाई काही नाही पण सचिन ला भारतरत्न मात्रलवकरात लवकर मिळाला पाहिजे असे हे राजकारण किती दिवस चालणार?
· · Share · Delete





04 July, 2011

मंदिरातील खजिना

भारतातील अनेक मंदिरातील अश्या प्रकारच्या खजिन्याचा काय उपयोग ?
हा सर्व खजिना जर भारतातील अर्थव्यवस्थेत समाविष्ट झाला तर देशातील सर्व गरीब आणि दारीद्र्यारेशेखालीलहोतकरू बुद्धिमान तरुणांना आपण उच्च शिक्षण देवू शकू.विशेषता:ग्रामीण भागातील अनेक शेतकरी असंख्यप्रकारच्या अडचणींचा सामना करीत आहेत त्यांच्या मदतीसाठी हा खजिना कमी येत असेल तर आज भारत देशहा जागतिक महासत्ता बनू शकतो.
माझ्या मते अश्या प्रकारच्या मंदिरान्मद्धे दान करणारे सामान्य नागरिक मूर्ख ठरत आहेत .आज आपण पाहतोसाई मंदिरातील पैसा बाहेर जात असताना अनेकवेळा पकडला गेला आणि त्याचा खुलासा विश्वस्त देवू शकलेनाहीत.एकंदरीत लोकांनी दिलेल्या पैश्याचा विनियोग कसा होतोय हे पारदर्शक असले पाहिजेत.नसता सर्व पैसाराष्ट्रीय संपत्ती म्हणून वापरला गेला पाहिजे पण तेथेही भ्रष्टाचार विरहित कारभार असला तरच उपयोगआहें.

19 June, 2011

सत्यसाइन्ची अफाट संपत्ती

श्री सत्यसाइन्च्या खोलीत नुकताच खजिना मिळाल्याचे सर्वांनी वाचलेच असेल.हि सर्व संपत्ती dead असल्यासारखीच आहें.अशा प्रकारच्या सर्व देवस्थानांच्या dead संपत्तीचा शासनाने ताबा जर घेतला तर भारतातील सर्व जनतेला या संपत्तीचा लाभ घेता येईल आणि गरीब आणि गरजू बुद्धिमान विद्द्यार्थ्याना उच्च शिक्षणासाठी अश्या संपत्तीची मदत झाली तर हि फार मोठी उपलब्धता असेल या कामी सर्व राजकीय नेत्यांनी प्रामाणिकपणे लक्ष घालून व्यवस्थितपणे हा प्रश्न हाताळला तर नक्कीच भारत देश हा जागतिक महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही.
आजही आपण पाहतो कि काही भाविक भक्त साईबाबाला सोन्याचे आसन भेट देतात तर काही भक्त सोन्याच्या धाग्यांनी विणलेली चादर भेट देतात पण अश्या प्रकारचा पैश्याचा विनियोग म्हणजे केवळ दुरुपयोग नव्हे काय?
तिरुपती बालाजी,शिर्डी चे साई बाबा इत्यादि ची अमाप संपत्ती याकामी घेता येवू शकते.

10 June, 2011

भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषण

माझे स्पष्ट मत असे आहें कि बाबा रामदेव स्वर्गवासी जरी झाले तरीही सरकार आता त्यांच्यासोबत कोणत्याही वाटाघाटी करण्यासाठी येत नाही.
रामदेव बाबांनी सुद्धा आंदोलन मागे घ्यावे आणि आपला जीव वाचवावा.आपणा सर्व सामान्य लोकांचे तर दोन्ही बाजूनी नुकसान होत आहें.कारण आपल्याला योगासाठी बाबा हवेत तेही जातील आणि भ्रष्टाचार आणि काळा पैसा हे तर बंद होणारच नाही कारण सरकारची तशी इछाच दिसत नाही.
आपण अंतर्मुख होवून जर प्रामाणिकपणे जर विचार केला तर भ्रष्टाचार या विषयाशी आपण स्वत: सुद्धा तेवढेच जबाबदार आहोत.
कोणत्याही कामासाठी आपण कार्यालयात जर गेलो तर फाईल पुढे सरकण्यासाठी आपण लाच देण्यासाठी मागेपुढे पहात नाही उलट आपण समाधानी होतो कि चला आपले काम नक्की होणार.हि प्रवृत्ती सर्व लोकांच्या रक्तातच भिनली आहें.जादूच्या कांडी ने काही क्षणातच हे सर्व थांबू शकत नाही त्यासाठी कालबद्ध योजना आखावी लागेल त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रामाणिक अधिकारी राबवावे लागतील तरच काही प्रमाणात तरी आळा बसू शकेल.
माझी प्रामाणिक इच्छा मी व्यक्त केली मग हे कोणाला कितपत पटेल हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहें.

07 June, 2011

बाबा रामदेव

रामदेव बाबा वर गुन्हा दाखल झाल्याची बातमी वाचली.सरकारला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि एकेक चुकीची स्टेप घेत जनमानसात असलेली काँग्रेस ची प्रतिमा वरचेवर डागाळत चालल्याचे चित्र दिसत आहें.वरून पंतप्रधानांनी असे म्हटले आहें कि घटना वाईट परंतु दुसरा पर्याय नव्हता.रात्रीच्यावेळी झोपलेल्या आंदोलकांवर अशा प्रकारे पोलीस कार्यवाई करणे हे कोणत्याही सुजाण नागरिकाला पटणारे नाही.दिग्विजयसिंग यांचे वक्तव्य असे कि बाबा ठग आहें.अहो ठग आहें हे खरे गृहीत धरले तर तुम्ही ठगाकडे airport वर तडजोड करण्यासाठी आणि तुमच्या मागण्या मान्य आहेत असे सांगत कसे काय गेलात? तो तर ठग आहें ना....
सामान्य नागरिकाना काहीच घेणे देणे नाही फक्त भ्रष्टाचार ह्या मुद्द्यावर देशातील बहुसंख्य बुद्धीजीवी बाबाना नक्कीच समर्थन देणारे आहेत याबद्दल काहीच शंका नाही.
राज ठाकरे यांचे statement मात्र नक्कीच विचार करायला लावणारे आहें कि या देशातील विरोधी पक्ष काय करत आहें?विरोधी पक्षाने उचालावायाचे प्रश्न अण्णा हजारे,रामदेवबाबा हे आंदोलनाद्वारे उचलीत आहेत आणि देशातील सर्व विरोधी पक्ष त्याना पाठींबा देत आहें हे चित्र नक्कीच दुर्दैवीआहें.

13 May, 2011

IPL CRICKET




IPL क्रिकेट बद्दलबोलाल तेवढकमीच आहें.कालचवर्तमानपत्रातबातमी आली किनांदेड येथे IPL क्रिकेट वर satta सुरु असतानापोलिसांनी काहीप्रतीष्ठीताना अटकझाली.आणि लाखोरुपये जप्त करण्यात आले.केवळ २०-२० ओवर्स च्या या सामन्यासाठी लोकांचे ( सामान्य जनतेचे ) किती पैसेजातात आणि या सामन्याचे संयोजक आणि तसेच या सामन्यांमद्धे खेळत असलेल्या संघांचे मालक किती रुपयेकमावतात हि आकडेवारी पाहिल्यास आपणास थक्क होण्याची वेळ येईल.माझी लोकमत ला विनंती आहें कि याआकडेवारीची सखोल चौकशी करून जनतेपुढे आणावी म्हणजे आपले क्रिकेट वेड हे कोणाचे खिसे भरत आहें यागोष्टीची जाणीव सामान्य क्रिकेट प्रेमीना होईल आणि त्यांचे डोळे उघडतील.
नीता अंबानी,प्रीती झिंटा,विजय मल्ल्या,शाहरुख किंवा अजून जे कोणी हे मालक लोक आहेत त्यांनी कधीमेळघाटातील कुपोषित बालके पाहिली आहेत?
ग्रामीण भागातील शेतकर्याना किती अवघड परिस्थितीतून जावे लागते हे त्यांनी कधी पाहिले आहें?
झोपडपट्टीतील असंख्य लहान बालके आपले बालपण विसरून जीवाला झेपणारी कामे करतात हे या लोकांनीपाहिले आहें काय ?
उकीर्ड्यावरील अन्नाचे कन शोधणारी भिकाऱ्यांची लहान बालके या लोकांनी कधी पाहिली आहेत?
चौकार ,षट्कार मारला कि आपल्या उघड्या मांड्या दाखवीत नाचणार्या cheer girls ला लालचावनार्या नजरेनेन्याहालाण्यार्या प्रेक्षकाना तरी जाणीव व्हावी कि आज आपण हजारो रुपयांचे तिकीट काढून हा सामना बघतआहोत पण खिसे कोणाचे भरत आहोत किती भरत आहोत?
त्या पेक्षा वर उपस्थित केलेल्या दुर्बल घटकांसाठी जर काही करता आले तर बरेच काही सार्थक होईल.
पण लक्षात कोण घेतो ?
महादेव
विश्वनाथ कापुसकरी
Basmatnagar जी. हिंगोली.
मो
.9423141008

04 May, 2011

दुर्दैवी निर्णय


सत्य साईच्या प्रशांती नीलयम आश्रमात साई कुलवंतसभागृहात त्यांचा पुतळा उभारण्यासाठी सचिन तेंडूलकरयाने तीस लाख रुपये खर्च करून त्यावर सोन्याचा मुलामादेण्याचाही खर्च करण्याची जवाबदारीही त्याने स्वीकारलीआहे असे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले आहे.
मी व्यक्तीशः सचिन तेंडूलकर चा चाहता आहे.आणि त्याचामला अत्यंत आदर आहें.मात्र पुतळ्याबद्दल खर्च करण्याचात्याचा निर्णय दुर्दैवी आहे असे मला वाटते.त्यापेक्षा त्यानेएखाद्या बुद्धिमान परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी खर्च करावेत किंवामेळघाटातील कुपोषित बालकांच्या पोशनाचा खर्च करणारया एखाद्या सेवाभावी संस्थेला देणगी म्हणून द्यावेतकिंवा ग्रामीण भागातील गरीब महिलांसाठी मोफत प्रसुतिग्रह काढण्यासाठी किंवा ग्रामीण भागातीलबालकामगाराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खर्च करावेत.अर्थात हि लांबलचक यादी लिहिण्यामागे सचिनची श्रद्धा दुखावण्याचा मुळीच उद्देश नाही.परंतु एवढ्यासाठीच वाटते कि अत्यंत श्रीमंत असलेल्या या trust ला पैसेदेण्यापेक्षा ज्याना पैशाची अत्यंत निकड आहे अशाच सामाजिक संस्थेकडे हा ओघ जावा हि प्रामाणिक भावनाआहे.
महादेव
विश्वनाथ कापुसकरी
बसमत्नगर
जी.हिंगोली
मो
.9423141008

10 April, 2011

अण्णांच्या उपोषनावरील टीका

अण्णांनी उपोषण सोडले पण हे हितसंबंधांचे राजकारण आहे अशी जी टीका होत आहे हि अत्यंत चुकीची आहे असे वाटते.एक तर १२१ कोटींच्या या देशात हा एकच हिरा निघाला ज्याने लोकपाल विधेयक या अतिशय ज्वलंत विषयावर हिमतीने आमरण उपोषण करून त्याची यशस्वी सांगता केली .
अहो टीका करायला काय लागते ? मिडीया ला तर आज खाद्यच हवे .( माफ करा हं मिडीयावाले ) .मी तर असे म्हणेन कि जसे अश्या प्रकारची टीका करणारे अनेक जन आज पुढे येत आहेत अगदी अश्याच प्रकारे अण्णा हजारे सारखे हजारो अण्णा जर तयार झाले तर हा भारत देश जगभरात महासत्ता म्हणून नक्कीच ओळखला जाईल.अण्णांची प्रेरणा घेऊन खरोखरच तरुण वर्गाने पुढाकार घेतला तर " सारे जहान से अच्छा हिंदोस्तान हमारा " हे गीत नक्कीच खरया अर्थाने सार्थठरेल.

05 April, 2011

अण्णा हजारे आणि लोकपाल बिल


लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी आज पासूनआमरण उपोषण सुरु केले आहे त्याला कोणत्याही सुजाणभारतीय नागरिकाचा नक्कीच पाठींबा असणार आहेकिंबहुना मी स्वतः तर या साठी सक्रीय म्हणजेच उपोषणसुद्धा करायला तयार आहे आणि असे कित्येक नागरिकआहेत जे कि अण्णा च्या कोणत्याही कृतीला डोळे झाकूनपाठींबा देतात कारण कि अण्णा जे काही करतात तेनागरिकांच्या हितासाठीच असते.
लोकपाल विधेयक काय आहे हे सर्वच सामान्य जनतेलाकदाचित माहितहि नसेल परंतु आता ibn लोकमत ने माहित करून दिले कि नेमके भ्रष्टाचारी नेते या लोकपालविधेयकात कसे अडचणीत येऊ शकतात.जे भ्रष्टाचारी आहेत ते नक्कीच शिक्षेस पात्र आहेत याबद्दल कोणाचेहीदुमत असण्याचे काहीच कारण नाही.केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून अन्नाना फार मोठ्याप्रमाणावर पाठींबा मिळेल याची मला तर खात्रीवाटते.

18 March, 2011

हसन अली " The Great "


मार्च २००७ मध्ये हसन आली याच्या पुणे येथील निवासस्थानी आयकरखात्याचीधाड पडली होती आणि त्यावेळेस तो एक रेस च्या घोड्यांचाव्यापारी असूनत्याचेकडे त्यावेळेस जवळपास ३५००० कोटी रुपयांचीमालमत्ता,प्रत्येकी एककोटी रुपये किमतीचे ४० रेस चे घोडे आणि स्विसबँकेत त्याच्या मालकीची १०खाती असे विवरण वर्तमानपत्रात छापूनआले होते.दैनिक सकाळ च्या दि.१३-३-२००७ रोजीच्या अंकात ई-पत्रे यासदरात " मोठ्यामाशाची जादू!"या मथळ्याखाली मी लिहिले होते कि मला या महान माणसाचा हेवावाटतो कारणलहान शहरातून छोटा मोठा व्यापार व्यवसाय करणारया वप्रामाणिकपणे प्राप्तीकर भरणार्या व्यापारयांवर अनेकदाप्राप्तीकरखात्याची वक्रद्रष्टी पडते आणि प्राप्तीकर खात्याकडून अधिकार्यांनादिलेल्या टार्गेट चे या व्यापार्यांना बळीव्हावे लागते. मात्र यापार्श्वभूमीवर हसन आली सारखे मोठे मासे काय जादू करतात कोणास ठाऊक!हसन अलीच्यामालमत्तेचे आकडे सामान्य माणसाला अचंबित करून तोंडात बोटघालायला लावणारे आहेत.२००७ मधील हिअघोषित मालमत्ता होती तर त्यावेळेसपासून ते २०११ पर्यंत प्राप्तीकर खाते काय करत होते हाही एकसंशोधनाचाविषय नव्हे काय ?आज आता ऐकलेल्या बात्म्यामध्ये असे समजले कि पुराव्या अभावी हसन आलीयाचीकोर्टाने जमानातीवर मुक्तता केली .वा रे प्राप्तीकर संचालनालय ....धन्य तो हसन आली आणि धन्य तोकायदा.......आजचे त्याच्या मालमत्तेचे आकडे ऐकल्यावर फोर्ब्स च्या यादीत त्याचे नावकसे काय नाही असेवाटल्यावाचून रहात नाही.तो ज्या सेक्टर मध्ये राहतो त्या सेक्टर मधील सर्व प्राप्तीकरअधिकार्यांशी हसन आली चेकाय संभंध आहेत हि गोष्ट तपासून पाहण्यासाठीअण्णा हजारेनाच पुढे यावे लागेल कारण दुसरया कोणाचेही वजनपडत नाही. Mahadev Kapuskari Basmathnagar Mob. 9423141008

07 August, 2010

भारतासाठी लाजिरवानी गोष्ट




केन्द्रीय मनुष्यबल विकास मंत्री श्री कपिल सिब्बल यानीराज्यसभेत कबूल केले की देशात तब्बल १२ लाख शिक्षकाच्या जागा रिक्त आहेत .ही अतिशय लाजीरवानी बाबआहे.आज देशाचे पंतप्रधान एकीकडे सांगतात की देशाचा आर्थिक विकासदर वाढला आहे आणि महागाई दर घटलाआहे.भारत हा जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे।
मात्र ज्या देशात शिक्षकाच्या १२ लाख जागा जर रिक्त असतील त्या देशाने जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्नकशाच्या आधारावर पहावे?


ग्रामीण भागातही बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणावर आहे मात्र त्याना दिशा देणारे शिक्षण उपलब्ध नाही जे उपलब्धआहे ते इतके महागडे आहे की सामान्य माणसाच्या आर्थिक क्षमतेच्या बाहेर आहे।
एकीकडे आर्थिक विकास दर वाढीच्या चर्चा हॉट असतानाच दुसरीकडे कृषि प्रधान असलेल्या भारतात ख़त विकतघेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या शेताकर्यावर शासनाचे नोकर असलेले पोलिस गोळ्या झाडतात,लाठीचार्जकरतात ही केवढी विसंगति आहे?
स्वातंत्र्य मिळून आज सहा दशके होउन गेली आहेत परन्तु शेताकर्याना त्याना पाहिजे असलेले ख़त पुरविन्यासशासन असमर्थ ठरत आहे आणि तिकडे विकासदर वाढला आहे असे रोज वर्तमानपत्रात छापून येते।
ज्या शेतकर्याच्या कश्तातुन,त्याने रक्त आटवून केलेल्या मेहनतिमुले देशाच्या राष्ट्रिय उत्पन्नात वाढ होते
त्याच्या नशिबी पोलिसांचा लाठीचार्ज,गोलीबार? ही कसली लोकशाही?
ख़त दुकानदार वातानुकूलित केबिन मद्धे फिरत्या खुर्चीवर बसून संगणकावर गेम खेलत बसतो आणि इकडेबिचारा शेतकरी आपल्या सर्व कुटुम्बियाना घेवुन उन्हातान्हात रांगेत उभा कारण की प्रत्येकी एक पोते मिलणारअसल्यामुले तर आपल्याला पाच पोते तरी मिलतिल ही आशा ...
किती ही कुचम्बना?


प्रमाणिकपणे मेहनत करुनसुद्धा tयाच्या नशिबी अशी हाल अपेश्ता जगाच्या पाठीवर इतरत्र कोठेही नसेल !


काय तर कृषिप्रधान देश!!!!!!!


वा रे लोकशाही..............



महादेव विश्वनाथ कापुसकरी


बसमथनगर जी.हिंगोली.
मोब.९४२३१४१००८


mvkapuskari@gmail.com



05 February, 2010

त्याच्यासारखा तोच










आज राहुल गांधीयांची मुंबई भेटम्हणजे केवलझंजावातहोता.एकावादलाप्रमानेत्याने मुम्बैतप्रवेश केलाआणि शिवसेनेचेकाले झेंडे दाखूननिषेधकरण्याच्याकार्यक्रमाचाराहुल यानीअक्षरशःफज्जाउडविला .मराठी
अमराठी चा वाद, हल्ल्यात बळी पडलेल्या शहीद जवानाच्या अपमानाचा वाद,हे सर्व मुद्दे बाजुलाच राहिले आणि
हा युवराज बाजी मारून व् सर्व विरोधकाना चारीमुन्द्या चीत करून एखाद्या वीरासारखा निघून गेला आणि मुंबईबघतच राहिली।
खरे तर गांधी घराण्याचे आकर्षण सर्वसमान्याना मुलातच आहे.त्यातही राहुल यानी जे काही केले ते कोणताहीइतर नेता करू शकलेला नाही।
मागे एके ठिकाणी मजूर काम करीत असलेले पाहून त्यानी गाडी थाम्बविली आणि त्या मजुरान्सोबत काही वेळकाम केले।
एका रात्री त्यानी एका गरीब शेताकरयाच्या घरी त्याच्यासोबताच जेवण करून घराबाहेरिल अंगनात बाजेवरझोपून शेताकरयाच्या जीवनाशी संवाद साधला .विदर्भात दौरयावर असताना एका वृद्ध महिलेशी संवाद साधुन तिचेदूक्ख जाणून घेतले।
आजही त्यानी मुम्बैत लोकल ने प्रवास करून सामान्य मुम्बैकर कसे जगतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला।
अनेक प्रवाशान्सोबत तसेच तरुनान्सोबत त्यानी संवाद साधुन सर्वानाच एक आश्चर्याचा सुखद धक्का दिला।
सार्वजनिक कार्यात असताना कुतुम्बातील आजी आणि वडिल यानी प्राणांची आहुति दिलेली असताना
इतक्या वर्दलीच्या ठिकाणी जिवाची परवा न करता हसतमुख सामोरे जाने हे काम केवल गांधी घरानेच
करू शकते हे त्यानी समर्थपणे दाखवून दिले.
धन्य ते घराने .................

05 August, 2009

आता बस्स.......झाले तेवढे पुरे झाले......


आज सर्वत्र सहावा वेतन आयोग लागु झालेला आहे.मुख्य सचिवापासुन तेतलागालातल्या कनिष्ठाताल्या कनिष्ठ कर्मचार्यापर्यंत सर्वानाच जवलपास २५% ते ३०% वेतान्वाध मिलालेली आहे.जगातील एक मोठी लोकशाही असलेला देश म्हणुन भारताकडेपाहिले जाते.अशा भारतातील एक अग्रगण्य पुढारलेले राज्य म्हणुन महाराष्ट्रासनावारुपास आनावयाचे असेल तर माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे सल्लागार( प्रामाणिक )
यानी महाराष्ट्रातील भ्रष्टाचार शुन्य पातलिवर आनान्यासाठी यशस्वी उपाय योजना करणे ती अमलात आनने
ही कालाची गरज आहे।
माननीय मुख्यमंत्री साहेबानी विभागीय पातलिवर जसे मुंबई,पुणे,नागपुर,औरंगाबाद येथे सर्व वरिष्ठ अधिकारी
( त्या त्या खात्यातील ) यांचे विभागीय चिंतन शिबिरे आयोजित करुन त्या त्या खात्याच्या प्रमुखाना सम्बंधित
खात्याच्या भ्रष्टाचारास सर्वस्वी जबाबदार धरून कार्यवाही करणे अगत्याचे आहे।
आज आपण पाहतो महसूल खात्यात आयुक्त,जिल्हाधिकारी,तहसीलदार,पेशकार,तलाठी यांची एक साखली
निर्माण झाल्याचे चित्र आपणास दिसेल.ज्यामधे सोयाबीन चे वाटप असेल,लाल्या रोगाचे वाटप असेल,जमिनीचा
फेरफार असेल किंवा अवर्षण किंवा अतिव्रष्टिचे वाटप असेल यामधे सर्वत्र भ्रष्टाचाराचा अतिरेक झाल्याचे
निदर्शनास येते।
दूसरी देखिल खाती जसे सा.बां.विभाग,जलसंपदा विभाग यामधे सुधा सचिव,मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता,
कार्यकारी अभियंता,उपविभागीय अभियंता कनिष्ठ अभियंता यांची काम करण्याच्या पद्धतीत भ्रष्टाचाराच्या
माध्यमातून विशिष्ट प्रकारची साखली निर्माण झाल्याचे एक चित्र आपणास पहावयास मिलते.मागील १० ते १५वर्षाच्या कालापासून वरिष्टांचे कनिश्तावर कामाविषयी नियंत्रण हलू हलू कमी होत गेल्याचे चित्र दिसून येते।
कालमानाप्रमाने जर सर्व शासकीय कर्मचार्याचे ( वरिष्ट ते कनिष्ट ) आर्थिक परिस्थितीचे तुलनात्मक परिक्षण
केल्यास असे दिसून येईल की शासनाच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी अधिकाधिक संपन्न सामान्यजनता अधिकाधिक विपन्न झाल्याचे दिसून येते।
हीच परिस्थिति पोलिस खाते,विद्युत खाते,शिक्षण खाते स्थानिक स्वराज्य संस्था यामद्धेही दिसून येईल।
स्थानिक स्वराज्य संस्थामाधिल निवडून आलेले प्रतिनिधि त्यांच्या प्रभागातिल विकासाची कामे करण्या पेक्षा
स्वत: कामाची ठेकेदारी करुन अधिकाधिक संपन्न कसे होता येईल हेच पाहताना दिसत आहेत।
आज अधिकारी,निवडून दिलेले प्रतिनिधि हे नैतिकता,सामाजिक बांधिलकी या सर्व नितिमुल्याना तिलांजलि
देवून आपले घर कसे अधिकाधिक संपन्न होइल याकडेच जास्त लक्ष देत आहेत असे चित्र दिसेल।
महाराष्ट्रापुरता विचार करावयाचा झाल्यास वरील परिस्थितीत बदल करावयाचा असेल तर सहाव्या वेतनआयोगाच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचारास " आता बस्स ...... झाले तेवढे पुरे झाले" हे घोषवाक्य ब्रीदवाक्य म्हणुनअधिकार्याना आचरणात आनन्यास भाग पाडावे।
माननीय मुख्यमंत्री व त्यांच्या सल्लागारानी एखाद्या रशियन राज्यक्रान्तिची किंवा फ्रेंच राज्यक्रान्तिची वाट न
पाहता भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र हे परिवर्तन घड़विल्यास न भूतो न भविष्यति ठरेल व हे कार्य आपल्याच कालात व्हावे ही साइचरनि प्रार्थना।
जय हिंद जय महाराष्ट्र
महादेव कापूसकरी
बसमथनगर जी। हिंगोली।
मोबा.9423141008

13 July, 2009

घातक निर्णय


दहावी तसेच बारावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एटिकेटी ची योजना लागू करण्याचा शासनाचानिर्णय अत्यंत घातक असून सर्व स्तरातून याचा विरोध केला गेला पाहिजे आणि या निर्णयाचाफेरविचार करण्यासाठी शासनाला भाग पाडले गेले पाहिजे.या निर्णयातून अनेक प्रकारे शैक्षणिकनुकसान होण्याची शक्यता आहे.1) प्रत्येक विद्यार्थ्याला दोन विषय गेले तरीही अकराविच्या वर्गातप्रवेश निसचित असल्यामुळे अभ्यासाविषयी कोणतेही गांभीर्य राहणार नाही.त्यामुळे निकाल घसरेल.2) अकराविच्या प्रवेशासाठी एटिकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची एकच गर्दी होईल त्याचा फायदा संस्थाचालकअवाच्यासवा फीस आकारून त्यांचे आर्थिक शोषण करतील.3)मागील काही वर्षात सरकारने कायम वीणाअनुदानीत तत्वावर अनेक संस्थाना कनिष्ठ महाविद्यालये खिरापटवाटल्याप्रमाणे वाटली आहेत.त्याची यादीपाहिल्यास असे दिसेल की सत्ताधारी नेते तसेच अनेक राजकीय शिक्षणसम्राट हेच अशा माविद्यालयांचे चालकआहेत असे चित्र दिसेल.आपल्याच लोकांची तुंबाडी भरण्यासाठीच हा घातक निर्णय घेतला आहे असे दिसते.4) यासर्व विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी जे प्राध्यापक लागतील त्यांच्याकडून नेमणूकातुन होणारी प्राप्ती ही वेगळीचअसेल हे वेगळे सांगण्याची काहीच आवश्यकता नाही.5)एटिकेटी गुणवत्ताधारक विद्यार्थी एकाच वर्गातबसविल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यतानाकारता येत नाही.6) एकंदरीत शिक्षणाचादर्जा घसरल्यामुळे पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणार्या मुलांची संख्या घटू शकते. महादेव विश्वनाथअप्पाकापुसकरी बसमतनगर जी.हिंगोली. मोबा -9423141008

06 July, 2009

मायावतीची मायानगरी


मायावती यानी राज्यात स्वतहाचे पुतळे उभारण्यासाठी काही कोटी रुपये खर्चकरण्याचा ठराव पारीत केल्याचे वाचून अशा प्रकारच्या खर्चाना केंद्राकडून काहीनिर्बंध असावेत सध्या जर अस्तित्वात नसतील तर तसा कायदा करण्याचीगरज आहे असे वाटते. जग आज मायक्रो कडून ण्यानो कडे जात आहे तसेचसंगणकीय जगात आज भारताचे संगणक इंजिनीयर आपले वर्चस्व सिद्ध करीतआहेत आणि दुसरीकडे हे नेते आपले पुतळे उभारण्यात कोट्यावधी रुपये अनाठायीखर्च करीत आहेत ही गोष्ट अत्यंत विसंगत आहे. विद्यापीठे,महाविद्यालये,शाळा,रुग्णालये,गरीब लोकांसाठीरोजगाराच्या योजना यासाठी आज निधी वापरला जाण्याची गरज असताना जर पुतळ्यासाठी पैसे वापरले जातअसतील तर केवळ राज्यातील नव्हे तर सर्व देशातील सामाजिक संस्था , समाज सेवक,लोकप्रतिनिधी,तसेचराज्यपाल,राष्ट्रपती,पंतप्रधान ,निवडणूक आयोग इत्यादिणी या प्रकरणी योग्य लक्ष घालून हा पैशाचा गरवापररोखला पाहिजे असे वाटते. महादेव विश्वनाथ कापुसकरी बसमतनगर जी.हिंगोली मोबा - 9423141008

21 March, 2009

राजकीय पक्षांचा जाहीरनामा आणि निवडनुक आयोग


आपण पाहात आहोत सद्ध्या लोकसभेच्या निवडनुकिच्याप्रचाराची रानधुमाली जोरात चालु आहे .काही पक्षांचेअधिकृत उमेदवार जाहिर झाले आहेत व् काहींचे लवकरचजाहिर होतील.हे सर्व होत असतानाच सर्व पक्षांचे आपापलेजाहिरनामे जाहिर होतील.आणि त्यामद्धे आमचा पक्ष जरसत्तेवर आला तर आम्ही विजेचे बिल माफ करूनटाकू,शेतकर्याचा सातबारा कोरा करून टाकू,व्यापार्याँचे कर्जमाफ करून टाकू,मुलींच्या लग्नासाठी अनुदान देऊ,तान्दुलदोन रुपये किलो दराने देऊ,अशी अनेक प्रकारची आमिषेदाखवून स्वत:कडे मते वलवुन घेण्यात यशस्वी होतात.इथपर्यंत ठीक आहे मात्र जाहिरनाम्यातिल किती बाबींची तेपक्ष पुर्तता करीत आहेत याबद्दल निवडनुक आयोग काहीही लक्ष देत नाही .वास्तविक पाहता प्रत्येक पक्षावरनिवडनुक आयोगाकडून आचारसंहिता लावलेली आहे त्या आचार सहिन्तेनुसाराच प्रत्येक पक्षाला त्यांचा प्रचारकार्यक्रम पार पाडवा लागतो परन्तु आजपर्यंत निवड नुक आयोगाने एखाद्या पक्षाला त्याने निवडून आल्यावरजाहिर नाम्यातिल आश्वासनांची पुर्तता का केलि नाही? असे विचारलेले एकिवात नाही .जर अवाच्यासवा आणिअवास्तव आश्वासने देवून एखादा पक्ष सत्तेवर आला आणि त्याने जाहिर नाम्यातिल गोष्टींचे पालन केले नाही तरतय पक्षाला सत्तेवरून खाली खेचन्याचा अधिकार निवड नुक आयोगाला असावयास हवा आणि आयोगाने हाअधिकार वापरायलाच पाहिजे तरच ही खोटी आश्वासने देण्याचे व् आमिष दाख्विन्याचे प्रकार बंद होतील अन्यथा हेरहतगादगे असेच चालु राहील व् निवडून येणारे राजकीय नेते दिवसेंदिवस गब्बर होत जातील आणि बिचारीनिष्पाप जनता केवल हात चोलित बसान्याशियाय किंवा पुढील निवड नुक येइपर्यंत कपालाला हात लावूनबस्न्याखेरिज काहीच करू शकणार नाही.

07 March, 2009

आदरणीय बापू


काही दिवसांपूर्वी भारतीय मद्यसम्राट विजयमल्ल्या यानी परदेशात असलेल्या महात्मागांधी यानी वापरलेल्या काही वस्तू काहीलाख डॉलर्स ची बोली लावून विकतघेतल्याचे वाचण्यात आले.अगोदर असे वाटले की केन्द्र सरकार चेप्रतिनिधी म्हणून श्री मल्ल्या हे लिलावात भाग घेत असतील,मात्रनंतर वर्तमानपत्रातून त्यानी असा खुलासा केला की या लिलावातत्यानी वैयक्तिकरित्या भाग घेतला.महात्मा गांधी यांची जयंती आपण दारूबंदी सप्ताह पाळून साजरा करतो कारणत्यानी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे दारू बंदी साठी खर्च केलेले सर्वश्रुत आहेच. 2 आकटोबर पासून सुरू होणारापूर्ण आठवडा शासनाकाडून दारूची दुकाने बंद करण्यासाठी कलेक्टर मार्फत आदेश देण्यात येतात.सत्य,अहिंसाआणि आस्पृश्यता,शाकाहार,साधे राहणीमान,ब्रम्हचर्य .बाबींवर त्यानी देशभरच नव्हे तर विदेशात पण त्यांचेचाहते लोक निर्माण केले.तसेच भारताने राष्ट्रपिता म्हणून या महात्म्याला सन्मान दिला.जगभरात अनेक ठिकाणीमहात्माजिंचे पुतळे त्यांच्या उच्च विच्चारसरणी ची साक्ष देत उभे आहेत.आणि अशा या राष्ट्रपित्याने वापरलेलेकाही सामान जाहीर लीलावाद्वारे विकत घेण्यासाठी भारत सरकार पुढे आले नाहीही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.शंभरकोटीच्याही पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या देशात केवळ एक माइचा लाल निघाला ज्याने हे सामान अमूल्यआहे याची जाणीव ठेवली मात्र दुर्दैवाने हा जिगरबाज मद्यसमराट म्हणून ओळखला जातो.केवढा हा दैवदुरवीलास?त्या महात्म्याच्या आत्म्याला काय वाटत असेल?
विख्यात मद्य सम्राट किंग फिशर कंपनीचे मालक विजय मल्ल्या यानी विदेशातील महात्मा गांधी यांच्या अमूल्य
वस्तू काही लाख डॉलर किमत मोजून खरेदी केल्याचे वाचून मनात क्षणभर असा विचार आला की बरे झाले बापू
च्या स्पर्शातून पावन झालेल्या वस्तू भारतात परत तरी येतील परंतु दुसर्याच क्षणी मेंदूच्या एका कोपर्यात अशी
जाणीव झाली की ज्या पुज्य महात्मा गांधीजीच्या जयंती निमित्त आपण दरवर्षी दारूबंदी सप्ताह साजरा करतो
आणि या सप्ताहात शासनाकडून दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश वगैरे निघतो आणि ठिकठीकाणी कार्यक्रम त्यामहात्म्याच्या जिवाला काय वाटत असेल ? किती ही विटंबना ?की दैव दुरवीलास ?
अनेक प्रतिक्रिया द्वारे काही लोक आनंद व्यक्त करीत आहेत परंतु मनाला कुठेतरी बोच आहे.आणि का असु नये ?
‍‍

05 March, 2009

सेलेब्रेशन ऑफ़ पोवेर्टी









One can understand the entertainment of 20-20 cricket but it is definately not so important to spend so much time and money which is helping to earn crores of money by the sponsors.whereas the slum area in India is still struggling for their primary needs.The sponsors like Shahrukh,Preeti Zinta,Mukesh Ambani,Vijay Mallya etc.should be visit Melghat to observe malnourished childs.They should also visit to the below poverty line people to know their pain,their illiteracy otherthan taking so much keen interest in choosing beautifull cheergirls for 20-20 matches.
It is also must for the spectators to analyse this contraversy. Now a days We are busy in celebrating the Oscar award won by the film which is made on poor situation of our country,but we have feel shame that we are celebrating our poverty.