07 June, 2011

बाबा रामदेव

रामदेव बाबा वर गुन्हा दाखल झाल्याची बातमी वाचली.सरकारला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि एकेक चुकीची स्टेप घेत जनमानसात असलेली काँग्रेस ची प्रतिमा वरचेवर डागाळत चालल्याचे चित्र दिसत आहें.वरून पंतप्रधानांनी असे म्हटले आहें कि घटना वाईट परंतु दुसरा पर्याय नव्हता.रात्रीच्यावेळी झोपलेल्या आंदोलकांवर अशा प्रकारे पोलीस कार्यवाई करणे हे कोणत्याही सुजाण नागरिकाला पटणारे नाही.दिग्विजयसिंग यांचे वक्तव्य असे कि बाबा ठग आहें.अहो ठग आहें हे खरे गृहीत धरले तर तुम्ही ठगाकडे airport वर तडजोड करण्यासाठी आणि तुमच्या मागण्या मान्य आहेत असे सांगत कसे काय गेलात? तो तर ठग आहें ना....
सामान्य नागरिकाना काहीच घेणे देणे नाही फक्त भ्रष्टाचार ह्या मुद्द्यावर देशातील बहुसंख्य बुद्धीजीवी बाबाना नक्कीच समर्थन देणारे आहेत याबद्दल काहीच शंका नाही.
राज ठाकरे यांचे statement मात्र नक्कीच विचार करायला लावणारे आहें कि या देशातील विरोधी पक्ष काय करत आहें?विरोधी पक्षाने उचालावायाचे प्रश्न अण्णा हजारे,रामदेवबाबा हे आंदोलनाद्वारे उचलीत आहेत आणि देशातील सर्व विरोधी पक्ष त्याना पाठींबा देत आहें हे चित्र नक्कीच दुर्दैवीआहें.

No comments: