07 March, 2009

आदरणीय बापू


काही दिवसांपूर्वी भारतीय मद्यसम्राट विजयमल्ल्या यानी परदेशात असलेल्या महात्मागांधी यानी वापरलेल्या काही वस्तू काहीलाख डॉलर्स ची बोली लावून विकतघेतल्याचे वाचण्यात आले.अगोदर असे वाटले की केन्द्र सरकार चेप्रतिनिधी म्हणून श्री मल्ल्या हे लिलावात भाग घेत असतील,मात्रनंतर वर्तमानपत्रातून त्यानी असा खुलासा केला की या लिलावातत्यानी वैयक्तिकरित्या भाग घेतला.महात्मा गांधी यांची जयंती आपण दारूबंदी सप्ताह पाळून साजरा करतो कारणत्यानी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे दारू बंदी साठी खर्च केलेले सर्वश्रुत आहेच. 2 आकटोबर पासून सुरू होणारापूर्ण आठवडा शासनाकाडून दारूची दुकाने बंद करण्यासाठी कलेक्टर मार्फत आदेश देण्यात येतात.सत्य,अहिंसाआणि आस्पृश्यता,शाकाहार,साधे राहणीमान,ब्रम्हचर्य .बाबींवर त्यानी देशभरच नव्हे तर विदेशात पण त्यांचेचाहते लोक निर्माण केले.तसेच भारताने राष्ट्रपिता म्हणून या महात्म्याला सन्मान दिला.जगभरात अनेक ठिकाणीमहात्माजिंचे पुतळे त्यांच्या उच्च विच्चारसरणी ची साक्ष देत उभे आहेत.आणि अशा या राष्ट्रपित्याने वापरलेलेकाही सामान जाहीर लीलावाद्वारे विकत घेण्यासाठी भारत सरकार पुढे आले नाहीही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.शंभरकोटीच्याही पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या देशात केवळ एक माइचा लाल निघाला ज्याने हे सामान अमूल्यआहे याची जाणीव ठेवली मात्र दुर्दैवाने हा जिगरबाज मद्यसमराट म्हणून ओळखला जातो.केवढा हा दैवदुरवीलास?त्या महात्म्याच्या आत्म्याला काय वाटत असेल?
विख्यात मद्य सम्राट किंग फिशर कंपनीचे मालक विजय मल्ल्या यानी विदेशातील महात्मा गांधी यांच्या अमूल्य
वस्तू काही लाख डॉलर किमत मोजून खरेदी केल्याचे वाचून मनात क्षणभर असा विचार आला की बरे झाले बापू
च्या स्पर्शातून पावन झालेल्या वस्तू भारतात परत तरी येतील परंतु दुसर्याच क्षणी मेंदूच्या एका कोपर्यात अशी
जाणीव झाली की ज्या पुज्य महात्मा गांधीजीच्या जयंती निमित्त आपण दरवर्षी दारूबंदी सप्ताह साजरा करतो
आणि या सप्ताहात शासनाकडून दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश वगैरे निघतो आणि ठिकठीकाणी कार्यक्रम त्यामहात्म्याच्या जिवाला काय वाटत असेल ? किती ही विटंबना ?की दैव दुरवीलास ?
अनेक प्रतिक्रिया द्वारे काही लोक आनंद व्यक्त करीत आहेत परंतु मनाला कुठेतरी बोच आहे.आणि का असु नये ?
‍‍

No comments: