Powered By Blogger

10 June, 2011

भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषण

माझे स्पष्ट मत असे आहें कि बाबा रामदेव स्वर्गवासी जरी झाले तरीही सरकार आता त्यांच्यासोबत कोणत्याही वाटाघाटी करण्यासाठी येत नाही.
रामदेव बाबांनी सुद्धा आंदोलन मागे घ्यावे आणि आपला जीव वाचवावा.आपणा सर्व सामान्य लोकांचे तर दोन्ही बाजूनी नुकसान होत आहें.कारण आपल्याला योगासाठी बाबा हवेत तेही जातील आणि भ्रष्टाचार आणि काळा पैसा हे तर बंद होणारच नाही कारण सरकारची तशी इछाच दिसत नाही.
आपण अंतर्मुख होवून जर प्रामाणिकपणे जर विचार केला तर भ्रष्टाचार या विषयाशी आपण स्वत: सुद्धा तेवढेच जबाबदार आहोत.
कोणत्याही कामासाठी आपण कार्यालयात जर गेलो तर फाईल पुढे सरकण्यासाठी आपण लाच देण्यासाठी मागेपुढे पहात नाही उलट आपण समाधानी होतो कि चला आपले काम नक्की होणार.हि प्रवृत्ती सर्व लोकांच्या रक्तातच भिनली आहें.जादूच्या कांडी ने काही क्षणातच हे सर्व थांबू शकत नाही त्यासाठी कालबद्ध योजना आखावी लागेल त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रामाणिक अधिकारी राबवावे लागतील तरच काही प्रमाणात तरी आळा बसू शकेल.
माझी प्रामाणिक इच्छा मी व्यक्त केली मग हे कोणाला कितपत पटेल हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहें.

No comments: