आज आपल्या भारत देशात हाफकिन Institute ,भाभा Institute ,सारख्य्या नामवंत संस्था कडून अनेक प्रकारच्या साथीच्या रोगांवर लस तयार केली जाते ज्यामुळे अश्या लसिद्वारे अनेक प्रकारच्या रोगप्रतिकारक जंतूंची आपल्या शरीरात निर्मिती केली जाते आणि हे लासिद्वारे शरीरात inject केलेले जंतू आपल्या शरीरात असलेल्या अनेक प्रकारच्या रोगांच्या जंतुना मारून टाकतात आणि त्यामुळे रोगांचे समूळ उच्चाटन होते आणि मनुष्य रोगमुक्त होतो.
आज आपल्या देशात भ्रष्टाचार या रोगाची लागण फार मोठ्ठ्या प्रमाणात झाली असून या भ्रष्टाचाराच्या रोगावर प्रतिकारक लस शोधणे अत्यंत गरजेचे झाले आहें. देशातील सर्व नामवंत संस्थामधील सर्व शास्त्रज्ञांना सरकारने स्पेशल आदेश देवून VACCINE AGAINST CORRUPTION हि लस शोधून तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे.
हि लस तयार केल्यानंतर देश पातळीवर लसीकरण मोहीम राबवावी. जसे पोलिओ लसीकरण देशपातळीवर सर्वत्र राबविले जाते,तसे स्वरूप या लसीकरणाचे असावे.देशातील सर्व सरकारी कर्मचारी ( शिपायापासून ते पंतप्रधानापर्यंत आणि न्यायाधीशांपासून ते आमदार खासदारांपर्यंत आणि नगरसेवकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत ) या सर्वाना हि लस टोचण्यात यावी जेणेकरून भ्रष्टाचाराचे सर्व जंतू कायमचे नष्ट होण्यास मदत होईल.या लसिमद्धे समाविष्ट असलेल्या जन्तुन्मद्धे असा गुणधर्म असावा कि ज्याप्रमाणे संगणक व्हायरस घुसल्यावर जसे त्यातील फायली नष्ट करतो आणि संगणक जाम होतो त्याप्रमाणे जर कोणी भ्रष्टाचारी व्यक्ती गैरव्यहाराद्वारे काही रक्कम स्वीकारीत असेल तर त्यावेळी त्या व्यक्तीचा मेंदू जाम करण्याची क्षमता या vaccine मद्धे असावी. या लसी च्या शोधामुळे जगभरात भ्रष्टाचारामुळे भारताची खराब झालेली प्रतिमा सुधारण्यास खूप मदत होईल आणि समाजातील सर्व स्तरातील नागरिक समाधानाचा श्वास घेतील.
No comments:
Post a Comment