Powered By Blogger

06 July, 2009

मायावतीची मायानगरी


मायावती यानी राज्यात स्वतहाचे पुतळे उभारण्यासाठी काही कोटी रुपये खर्चकरण्याचा ठराव पारीत केल्याचे वाचून अशा प्रकारच्या खर्चाना केंद्राकडून काहीनिर्बंध असावेत सध्या जर अस्तित्वात नसतील तर तसा कायदा करण्याचीगरज आहे असे वाटते. जग आज मायक्रो कडून ण्यानो कडे जात आहे तसेचसंगणकीय जगात आज भारताचे संगणक इंजिनीयर आपले वर्चस्व सिद्ध करीतआहेत आणि दुसरीकडे हे नेते आपले पुतळे उभारण्यात कोट्यावधी रुपये अनाठायीखर्च करीत आहेत ही गोष्ट अत्यंत विसंगत आहे. विद्यापीठे,महाविद्यालये,शाळा,रुग्णालये,गरीब लोकांसाठीरोजगाराच्या योजना यासाठी आज निधी वापरला जाण्याची गरज असताना जर पुतळ्यासाठी पैसे वापरले जातअसतील तर केवळ राज्यातील नव्हे तर सर्व देशातील सामाजिक संस्था , समाज सेवक,लोकप्रतिनिधी,तसेचराज्यपाल,राष्ट्रपती,पंतप्रधान ,निवडणूक आयोग इत्यादिणी या प्रकरणी योग्य लक्ष घालून हा पैशाचा गरवापररोखला पाहिजे असे वाटते. महादेव विश्वनाथ कापुसकरी बसमतनगर जी.हिंगोली मोबा - 9423141008

No comments: