24 January, 2009

महाराष्ट्र विरुद्ध कर्णाटक

बेळगाव मधील मराठी भाषिक आणि कानडी या दोघांच्या वादावरून दोन्ही राज्यांमद्धे जी मोडतोड चालू आहे तो
प्रकार म्हणजे फार दुर्दैवी आहे.महाराष्ट्रीय लोकाणी कर्नाटक बँकेवर दगडफेक करणे कर्नाटकी लोकाणी महाराष्ट्र

बँकेवर दगडफेक करणे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे किंवा आपण आपल्याच नोटा फाडून टाकणे असा प्रकार

आहे.जर बेळगाव महाराष्ट्रात सामील केले तर काय फायदा होणार आहे? महाराष्ट्रातील रस्ते सुधारतील?,अनेक

खेड्यांमद्धे पिण्याचे पाणी नाही तेथे पाणी येईल?,अनेक बेकार फिरत आहेत त्याना रोजगार मिळेल?,विजेचा

प्रश्न सुटण्यास मदत होईल?जागोजागी होणारा भ्रष्टाचार नष्ट होईल? आज भेडसावणारा वाढत्या लोकसंख्येचा

प्रश्न सुटेल? या सर्व प्रश्नांवर जर तोडगा निघत असेल तर अवश्य बेळगावला महाराष्ट्रात घेण्यासाठी संघर्ष करावा.
आपल्या समोर आज लोकांच्या जिव्हाळ्याचे असंख्य प्रश्न अणूत्तरीत असताना लोकांचे लक्ष निरर्थक बाबींकडे

वाळविणार्या स्वार्थी राजकारणी लोकापासून सामान्यांनि दूर राहीले तरच आपली जीवन मूल्य आपण सुधारू

शकू.माझ्या एका मित्राची सासर वाडि कर्नाटक मधील बेळगाव ही आहे.मग त्याने महाराष्ट्र कर्नाटक वादात बायको

सोडून द्यावी? आपण अमेरिकेची राष्ट्राध्यक्षाची निवडणूक पाहिली.ओबामा यानी त्यांच्या प्रचारात कोठेही असेम्हटले नाही की

मला निवडल्यास मी काळ्या लोकांसाठी शासकीय नोकर्यामद्धे अमुक अमुक टक्के आरक्षण देईन,मी शेतकर्यांची

वीज माफ करीन,मी त्यांचे सर्व कर्ज माफ करीन सातबारा कोरा करीन,बचत गाटां ना कमी व्याजदराने कर्जदेईन.
कुठे तो शपथ ग्रहण सोहळ्याचा नजरेचे पारणे फेडनारा कार्यक्रम ? विस लाख नागरिक आणि कमालीची शांतता .
नाहीतर आपलेकडे मुंबईला कुठलासा मोर्चा असला की चलो मुंबई म्हणत बिगर तिकीट असंख्य जमाव रेल्वेतआरक्षित
सीट आणि बर्थ वर ताबा मिळविण्यात फार मोठा बहुमान समजतात. 1942 साली ईंग्लंड चे पंतप्रधान विन्स्टनचर्चिल

यानी म्हटले होते की भारत देशाला कशाला स्वातंत्र्य हवे?स्वातंत्र्य कशाशी खातात हे त्याना माहीत नाही.
आज आपणास स्वतंत्र होऊन 60 वर्षे होत आहेत .परंतु आपण आपल्यात आपणच एकमेकांशी भांडत आहोत हेपाहून

विन्स्टन चर्चिल यांचे विधान खरेच होते असे वाटते.

20 January, 2009

महान ओबामा

First of all I feel myself very lucky to watch the oath ceremony live on IBN LOMAT channel.It was the only indian channel which gave me the great opportunity to observe the spectaculer grand ceremony of the oath.Today in karnatak there is a chrisis between marathi & kanadi.while Barak Obama in his first speech after oath says "we are one".There is very big challange before Obama is to come out from the economic chrisis in America.He confidently said we will do it.It was feeling that Obama is talking not only before Americans but he is addressing to whole world.Todays IBN LOKMAT question is Will Obama give new direction to the world? YES,he will definately give new direction.more than 75% answers are yes.It will be very intersting to observe what will the plans of Obama to come out from the economic chrisis.

10 January, 2009

वाह्तुकदारावर शासनाकडून दडपशाही

वाह्तुकदारान्चा देशव्यापी संप अजुनही मिटलेला नाही .डीज़ल आणि पेट्रोल च्या कीमती कमी करने ही त्यांचीप्रमुख मागणी आहे व् ती अतिशय रास्त आहे .कारण आपण पाहात आहोत की जागतिक पातालिवर कच्च्या तेलाच्या किमतीकडे पाहिल्यास असे दिसेल की गेल्या जवलपास ते महीन्यामध्हे १५० डॉलर प्रति बरालअसलेली कच्च्या तेलाची कीमत आज फ़क्त ४० डॉलर प्रति बराल अशी आहे। म्हणजेच एक तृतुयांश पेक्षाही याकीमती कमी झालेल्या दिसत आहेत मात्र पेट्रोल आणि डीज़ल च्या कीमती त्या प्रमाणात कमी झालेल्या नाहित।

अगोदरच
वाह्तुकदार अनेक संकटातून जात आहेत .आणि हां संप चिरडून टाकण्यासाठी शासनाने काही नेत्यानाअटक केलि आहे ते चुकीचे वाटते .याउलट या नेत्याना विश्वासात घेवून त्यांच्याशी चर्चा करून योग्य

तो तोडगा काढण्यात आल्यास ते अधिक योग्य असेल असे वाटते.शासकीय कर्मचार्याना सहावा वेतन आयोग,शेतकर्यांचे कर्ज माफ ,आमदार तसेच खासदार यांच्या नीधिमद्धे भरमसाठ वाढ,राष्ट्रपति आणि राज्यपालयांचे वेतन अनुक्रमे दिड लाख व् सव्वा लाख रुपये प्रतिमाह मात्र वाह्तुकदारानी त्यांच्या रास्त मागण्या केल्या तर त्यांच्या नेत्याना जीवनावश्यक कायद्याची धमकी देवून जेल मद्धे रवानगी हे धोरण म्हणजे अक्षरशः दड़प शाहिचा प्रकार आहे.

06 January, 2009

हवाई सुंदरी जमिनीवर.

एअर इंडिया च्या हवाई सुन्दरिंसाठी असलेल्या नॉर्म्स पेक्षा जास्त वजन झाल्य्यामुले एअर इंडिया ने दहा
हवाई सुन्दरिना कामावरून कमी केले आहे.अशी बातमी वाचण्यात आली.अतिशय चांगला निर्णय असून एअरइंडिया च्या व्यवस्थापनाचे या निर्णयाबद्दल अभिनन्दन करायला हवे.कारण आपले वजन मर्यादित हवे ही कल्पना
या हवाई सुन्दरिना होती.वजन कमी करण्यासाठी त्याना पूर्वसूचना संधि देखिल दिल्या गेली होती .तरीही त्याआपले वजन कमी करण्यात अपयशी ठरल्या त्यामुले त्याना घरी जाण्याची वेळ आली।
त्यानिमित्ताने त्यांच्या जागी नविन तरुनिना संधि मिळेल.अशी कठोर भूमिका नियम तोडनार्या सर्वच शासकीय
कर्मचार्याविरुद्ध घेतली जाने आज कालाची गरज आहे.आज आपण कोणत्याही कार्यालयात कामानिमित्त गेलो तर
अनेक कर्मचारी आपल्या खुर्चीवर नाहित असे
aadhalun येते आत्ताच चहासाठी बाहर गेलेत असे उत्तर मिलते
मात्र चहाचे निमित्त करूनजनून बुजुन टाइम पास केला जातो ही खरी वस्तुस्थिति आहे.कड़क नियमानुसार काटेकोरपणे नियमाचे पालन करून आशा कामचुकार कर्मचार्यावर योग्य कार्यवाही झाल्यास सामान्यांची कामे
वेळेवर होण्यास मदत होइल.

04 January, 2009

स्त्री

सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री जीवन सुधारण्यासाठी केलेल्या संघर्शाबद्दल आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्यालक्षात येते की त्या काळी त्याना हा लधा देण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला असेल ?मात्र आजची स्त्री सुद्धाकिती सुरक्षित आहे ? देशातील गुन्हेगारिचे प्रमाण पाहिले तर स्त्रियांचे शोषण चे प्रमाण सर्वाधिक दिसेल .त्यातहीविशेष म्हणजे लोक लज्जेस्तव अनेक गुन्हे नोंदविलेच जात नाहित त्यामुले स्त्रियाविशयिन्च्या गुन्ह्यांची खरीआकडेवारी समजूनच येत नाही .कधी कधी मनाशी स्त्रियांच्या या खडतर जीवन प्रवासाबद्दल विचार केला तर असेवाटते की खरोखरच स्त्री जीवन हा एक फार मोठा जुगार आहे. आयुष्यभर स्त्री या प्रवासातीलखाचखाल्गे,अत्याचार,अपमान,शोषण या सर्व गोष्टींचा मुकाबला कसा काय करीत असेल ते देवच जाने! स्त्री हीआयुष्यभर कशी परावलम्बी आहे हे पहावयाचे झाल्यास बाल पनी पित्याच्या अधिपत्याखाली, तरुणपनी पतीच्याअधिपत्याखाली आणि वृद्धअवस्थेत पुत्राच्या अधिपत्याखाली तिला आपले आयुष्य काढावे लागते। जरी आर्थिकदृष्टया स्वावलंबी असली तरीही तिला घरात पुरुशासमान स्थान दिले जात नाही तरीही जगाला एक गोष्ट मान्यकरावीच लागेल की स्त्री मद्धे बालिकेच्या भूमिकेत निरागसता,प्रेयसी किंवा पत्नीच्या भूमिकेत प्रेम,मातेच्या भूमिकेत वात्सल्य या अश्या तिहेरी भूमिकेतुन स्वतः चे अस्तित्व सिद्ध करण्याची निसर्गतः शक्ति आहेच.

02 January, 2009

आज सावित्रीबाई फुले असत्या तर ...........

आज देशाची राष्ट्रपति एक महिला असताना देखिल महिलावारिल अत्याचाराच्या घटानामद्धे घट होता

वाढाच होत आहे असे चित्र आहे.दरहजारी पुरुशामागे केवल ९२३ स्त्रियांचे प्रमाण आहे असे सर्वे प्रमाने दिसत आहे।

अश्याच प्रमाणात जर ही आकडेवारी विषम होत राहिली तर त्याचे गंभीर परिणाम सर्व देशालाच भोगावे लागतील .आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस .आज जर सावित्रीबाई असत्या तर .......

आजच्या या पुरूष आणि महिला यांच्या व्यस्त प्रमानासाठी एखादा फार मोठा संघर्ष पूर्वक लढा दिला असता

आज कायद्याने गर्भालिंग परिक्षण करण्यावर जरी बंदी असली तरीही सेक्स परिक्षण चोरून लपून होताच आहे त्यामूले हे व्यस्त प्रमाण वाढतच जात आहे।