सत्य साईच्या प्रशांती नीलयम आश्रमात साई कुलवंतसभागृहात त्यांचा पुतळा उभारण्यासाठी सचिन तेंडूलकरयाने तीस लाख रुपये खर्च करून त्यावर सोन्याचा मुलामादेण्याचाही खर्च करण्याची जवाबदारीही त्याने स्वीकारलीआहे असे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले आहे.
मी व्यक्तीशः सचिन तेंडूलकर चा चाहता आहे.आणि त्याचामला अत्यंत आदर आहें.मात्र पुतळ्याबद्दल खर्च करण्याचात्याचा निर्णय दुर्दैवी आहे असे मला वाटते.त्यापेक्षा त्यानेएखाद्या बुद्धिमान परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी खर्च करावेत किंवामेळघाटातील कुपोषित बालकांच्या पोशनाचा खर्च करणारया एखाद्या सेवाभावी संस्थेला देणगी म्हणून द्यावेतकिंवा ग्रामीण भागातील गरीब महिलांसाठी मोफत प्रसुतिग्रह काढण्यासाठी किंवा ग्रामीण भागातीलबालकामगाराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खर्च करावेत.अर्थात हि लांबलचक यादी लिहिण्यामागे सचिनची श्रद्धा दुखावण्याचा मुळीच उद्देश नाही.परंतु एवढ्यासाठीच वाटते कि अत्यंत श्रीमंत असलेल्या या trust ला पैसेदेण्यापेक्षा ज्याना पैशाची अत्यंत निकड आहे अशाच सामाजिक संस्थेकडे हा ओघ जावा हि प्रामाणिक भावनाआहे.
महादेव विश्वनाथ कापुसकरी
बसमत्नगर जी.हिंगोली
मो .9423141008
No comments:
Post a Comment