10 April, 2011

अण्णांच्या उपोषनावरील टीका

अण्णांनी उपोषण सोडले पण हे हितसंबंधांचे राजकारण आहे अशी जी टीका होत आहे हि अत्यंत चुकीची आहे असे वाटते.एक तर १२१ कोटींच्या या देशात हा एकच हिरा निघाला ज्याने लोकपाल विधेयक या अतिशय ज्वलंत विषयावर हिमतीने आमरण उपोषण करून त्याची यशस्वी सांगता केली .
अहो टीका करायला काय लागते ? मिडीया ला तर आज खाद्यच हवे .( माफ करा हं मिडीयावाले ) .मी तर असे म्हणेन कि जसे अश्या प्रकारची टीका करणारे अनेक जन आज पुढे येत आहेत अगदी अश्याच प्रकारे अण्णा हजारे सारखे हजारो अण्णा जर तयार झाले तर हा भारत देश जगभरात महासत्ता म्हणून नक्कीच ओळखला जाईल.अण्णांची प्रेरणा घेऊन खरोखरच तरुण वर्गाने पुढाकार घेतला तर " सारे जहान से अच्छा हिंदोस्तान हमारा " हे गीत नक्कीच खरया अर्थाने सार्थठरेल.

05 April, 2011

अण्णा हजारे आणि लोकपाल बिल


लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी आज पासूनआमरण उपोषण सुरु केले आहे त्याला कोणत्याही सुजाणभारतीय नागरिकाचा नक्कीच पाठींबा असणार आहेकिंबहुना मी स्वतः तर या साठी सक्रीय म्हणजेच उपोषणसुद्धा करायला तयार आहे आणि असे कित्येक नागरिकआहेत जे कि अण्णा च्या कोणत्याही कृतीला डोळे झाकूनपाठींबा देतात कारण कि अण्णा जे काही करतात तेनागरिकांच्या हितासाठीच असते.
लोकपाल विधेयक काय आहे हे सर्वच सामान्य जनतेलाकदाचित माहितहि नसेल परंतु आता ibn लोकमत ने माहित करून दिले कि नेमके भ्रष्टाचारी नेते या लोकपालविधेयकात कसे अडचणीत येऊ शकतात.जे भ्रष्टाचारी आहेत ते नक्कीच शिक्षेस पात्र आहेत याबद्दल कोणाचेहीदुमत असण्याचे काहीच कारण नाही.केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून अन्नाना फार मोठ्याप्रमाणावर पाठींबा मिळेल याची मला तर खात्रीवाटते.