Powered By Blogger

05 April, 2011

अण्णा हजारे आणि लोकपाल बिल


लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी आज पासूनआमरण उपोषण सुरु केले आहे त्याला कोणत्याही सुजाणभारतीय नागरिकाचा नक्कीच पाठींबा असणार आहेकिंबहुना मी स्वतः तर या साठी सक्रीय म्हणजेच उपोषणसुद्धा करायला तयार आहे आणि असे कित्येक नागरिकआहेत जे कि अण्णा च्या कोणत्याही कृतीला डोळे झाकूनपाठींबा देतात कारण कि अण्णा जे काही करतात तेनागरिकांच्या हितासाठीच असते.
लोकपाल विधेयक काय आहे हे सर्वच सामान्य जनतेलाकदाचित माहितहि नसेल परंतु आता ibn लोकमत ने माहित करून दिले कि नेमके भ्रष्टाचारी नेते या लोकपालविधेयकात कसे अडचणीत येऊ शकतात.जे भ्रष्टाचारी आहेत ते नक्कीच शिक्षेस पात्र आहेत याबद्दल कोणाचेहीदुमत असण्याचे काहीच कारण नाही.केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून अन्नाना फार मोठ्याप्रमाणावर पाठींबा मिळेल याची मला तर खात्रीवाटते.

No comments: