19 June, 2011

सत्यसाइन्ची अफाट संपत्ती

श्री सत्यसाइन्च्या खोलीत नुकताच खजिना मिळाल्याचे सर्वांनी वाचलेच असेल.हि सर्व संपत्ती dead असल्यासारखीच आहें.अशा प्रकारच्या सर्व देवस्थानांच्या dead संपत्तीचा शासनाने ताबा जर घेतला तर भारतातील सर्व जनतेला या संपत्तीचा लाभ घेता येईल आणि गरीब आणि गरजू बुद्धिमान विद्द्यार्थ्याना उच्च शिक्षणासाठी अश्या संपत्तीची मदत झाली तर हि फार मोठी उपलब्धता असेल या कामी सर्व राजकीय नेत्यांनी प्रामाणिकपणे लक्ष घालून व्यवस्थितपणे हा प्रश्न हाताळला तर नक्कीच भारत देश हा जागतिक महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही.
आजही आपण पाहतो कि काही भाविक भक्त साईबाबाला सोन्याचे आसन भेट देतात तर काही भक्त सोन्याच्या धाग्यांनी विणलेली चादर भेट देतात पण अश्या प्रकारचा पैश्याचा विनियोग म्हणजे केवळ दुरुपयोग नव्हे काय?
तिरुपती बालाजी,शिर्डी चे साई बाबा इत्यादि ची अमाप संपत्ती याकामी घेता येवू शकते.

10 June, 2011

भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषण

माझे स्पष्ट मत असे आहें कि बाबा रामदेव स्वर्गवासी जरी झाले तरीही सरकार आता त्यांच्यासोबत कोणत्याही वाटाघाटी करण्यासाठी येत नाही.
रामदेव बाबांनी सुद्धा आंदोलन मागे घ्यावे आणि आपला जीव वाचवावा.आपणा सर्व सामान्य लोकांचे तर दोन्ही बाजूनी नुकसान होत आहें.कारण आपल्याला योगासाठी बाबा हवेत तेही जातील आणि भ्रष्टाचार आणि काळा पैसा हे तर बंद होणारच नाही कारण सरकारची तशी इछाच दिसत नाही.
आपण अंतर्मुख होवून जर प्रामाणिकपणे जर विचार केला तर भ्रष्टाचार या विषयाशी आपण स्वत: सुद्धा तेवढेच जबाबदार आहोत.
कोणत्याही कामासाठी आपण कार्यालयात जर गेलो तर फाईल पुढे सरकण्यासाठी आपण लाच देण्यासाठी मागेपुढे पहात नाही उलट आपण समाधानी होतो कि चला आपले काम नक्की होणार.हि प्रवृत्ती सर्व लोकांच्या रक्तातच भिनली आहें.जादूच्या कांडी ने काही क्षणातच हे सर्व थांबू शकत नाही त्यासाठी कालबद्ध योजना आखावी लागेल त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रामाणिक अधिकारी राबवावे लागतील तरच काही प्रमाणात तरी आळा बसू शकेल.
माझी प्रामाणिक इच्छा मी व्यक्त केली मग हे कोणाला कितपत पटेल हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहें.

07 June, 2011

बाबा रामदेव

रामदेव बाबा वर गुन्हा दाखल झाल्याची बातमी वाचली.सरकारला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि एकेक चुकीची स्टेप घेत जनमानसात असलेली काँग्रेस ची प्रतिमा वरचेवर डागाळत चालल्याचे चित्र दिसत आहें.वरून पंतप्रधानांनी असे म्हटले आहें कि घटना वाईट परंतु दुसरा पर्याय नव्हता.रात्रीच्यावेळी झोपलेल्या आंदोलकांवर अशा प्रकारे पोलीस कार्यवाई करणे हे कोणत्याही सुजाण नागरिकाला पटणारे नाही.दिग्विजयसिंग यांचे वक्तव्य असे कि बाबा ठग आहें.अहो ठग आहें हे खरे गृहीत धरले तर तुम्ही ठगाकडे airport वर तडजोड करण्यासाठी आणि तुमच्या मागण्या मान्य आहेत असे सांगत कसे काय गेलात? तो तर ठग आहें ना....
सामान्य नागरिकाना काहीच घेणे देणे नाही फक्त भ्रष्टाचार ह्या मुद्द्यावर देशातील बहुसंख्य बुद्धीजीवी बाबाना नक्कीच समर्थन देणारे आहेत याबद्दल काहीच शंका नाही.
राज ठाकरे यांचे statement मात्र नक्कीच विचार करायला लावणारे आहें कि या देशातील विरोधी पक्ष काय करत आहें?विरोधी पक्षाने उचालावायाचे प्रश्न अण्णा हजारे,रामदेवबाबा हे आंदोलनाद्वारे उचलीत आहेत आणि देशातील सर्व विरोधी पक्ष त्याना पाठींबा देत आहें हे चित्र नक्कीच दुर्दैवीआहें.