Powered By Blogger

25 September, 2012

सार्वजनिक गणेश उत्सवाचे स्वरूप : काल आणि आज

लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी १८९३ मद्धे गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देवून त्याचे पुनुरुज्जीवन केले .यापूर्वी गणेशोत्सव हे घरोघर खाजगी रुपात होत असत मात्र टिळकांनी त्याला १० दिवसांचे सार्वजनिक स्वरूप दिले.त्यामागे त्यांचे दोन उद्देश होते.एक म्हणजे या उत्सवाने ब्रिटीश विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे समस्त हिंदू समाज एकत्र येवून त्यांच्यातील एकोपा वाढावा आणि एकमेकांच्या विचारांची देवान घेवाण व्हावी.त्यानिमित्ताने त्यांनी अनेक ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात व्याख्यानमाला आयोजित करून समाजात एका नवीन दिशा दर्शक उपक्रमाची सुरुवात केली.
परंतु जसजसा काल बदलत गेला तसे गणेशोत्सवाचे स्वरूपही बदलत गेले आणि विशेषत: युवावर्ग या उत्सवात मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाला आणि या उत्सवातील व्याख्यानमाला आणि कौटुंबिक नाटके इत्यादी प्रकार मागे पडून त्याजागी चित्रपटातील भडक स्वरूपातील गाण्यावर नाच करणे ,दारू पिवून धांगड धिंगा करणे ,गणेश मूर्ती पुढे जुगार खेळणे जमा झालेल्या प्रचंड वर्गणीची उधळपट्टी करणे असे प्रकार चालू झाल्यामुळे अनेक ठिकाणी खरे गणेश भक्त बाजूलाच रहात आहेत.अर्थात ह्या गोष्टी सर्वच ठिकाणी नाहीत ,अनेक ठिकाणी अजूनही चांगले उपक्रम अवश्य घेतले जातात मात्र हे प्रमाण कमी आहें.
मात्र दुर्दैवाने असे म्हणावे लागेल की लोकमान्य टिळकांचा एवढा चांगला उदात्त हेतू हा काळाआड जावू पहात आहें आणि या वेगवान आणि संगणकीय युगात नवीन प्रवाह येवू पहात आहेत .
                              
                                                  महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी
                              
                                                  बसमतनगर जी. हिंगोली.

02 August, 2012

टीम अण्णांचा दुर्दैवी निर्णय

आपण पहात आहोत की गेले  ९-१० दिवस सातत्याने उपोषण करूनही या वेळेस जनतेने ,मिडीया ने आणि सरकारने सुद्धा याची फारशी दाखल घेतली नाही आणि हे उपोषण केवळ निश्क्रीयच नव्हे तर सर्वांसाठी एक देखावाच ठरले अर्थात या उपोशनातील काही मागण्या जरी महत्वपूर्ण वाटत असल्या तरीही केवळ टीम अण्णा नेच या साठी पाठपुरावा करावा आणि इतर सर्व जनतेने केवळ तमाशा बघावा हे कोणत्याही सुज्ञ नागरिकास नक्कीच रुचणारे नाही त्यासाठी देशभरातून भरभरून प्रतिसाद मिळावयास हवा जो की मिळाला नाही आणि मिळणारही नाही कारण आज च्या वेगवान जीवनात या प्रश्नावर विचार करायला कोणाला वेळ आहें ? आणि किती टक्के बुद्धीजीवी लोक या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करतात याचा जर सर्वे केला तर नक्कीच निराशाजनक आकडेवारी हाती येयील.मात्र एक गोष्ट नक्कीच खटकण्यासारखी आहें ती म्हणजे अण्णांचा नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय ! सध्याच्या जमान्यात निवडणुकीत यशस्वी होणे हे अन्नासार्ख्या व्यक्तीला किंवा त्यांनी काढलेल्या पक्षाला शक्य होईल असे मुळीच वाटत नाही.कारण आज आपण पाहतो निवडणुकीत ज्या मार्गांचा वापर केला जातो त्या मार्गाने टीम अण्णा चे सहकारी जावूच शकत नाहीत कारण तो मार्ग अनैतिक आहें आणि निवडणूक तर केवळ नैतिक मार्गाने आणि प्रामाणिकपणे जिंकली जाउच शकत नाही हे एक निर्विवाद सत्य आहें असे वाटते.जेष्ठ समाजसेविका मेघा पाटकर यांनी मात्र अण्णाना एक चांगला सल्ला दिला आहें की नवीन पक्ष स्थापनेपूर्वी हजार वेळा विचार करा हा अतिशय समर्पक वाटतो अण्णांनी जरूर विचार करावा आणि जेवढा तमाशा झाला तिथेच संपवावा असे प्रामाणिकपणे वाटते.

19 June, 2012

अमीर ला राज्यसभेचे खास आमंत्रण

राज्यसभेत भाषण देण्यासाठी अमीर खान ला आमंत्रण देण्यात आले हि खरोखरच एक आनंदाची आणि चांगली बातमी आहें.परंतु त्याचबरोबर एका गोष्टीचे अत्यंत वैषम्य वाटते की वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकार राज्यसभेत उघडकीस आणण्यासाठी एका चित्रपट कलावंताला पाचारण करावे लागते हि गोष्ट कुठेतरी मनाला वेदना देते.कारण की आपले राज्यसभेचे एकूण सदस्य आणि लोकसभेचे एकूण सदस्य या पैकी एकही सदस्य ह्या गैरप्रकाराचा सखोल अभ्यास करून त्यावर भाषण देवू शकत नाही काय ?
किंवा लोकसभेचे सभापती किंवा राज्यसभेचे सभापती स्वत: ह्या विषयावर विशेष अभ्यास करून या क्षेत्रातील सर्व गैरप्रकार उघडकीस आणू शकले असते तर भारतीय संसदेचा आदर सामान्य नागरिकांच्या मनात नक्कीच दुणावला असता असे वाटते.
सत्यमेव जयते द्वारे आजपर्यंत अमीर खान ने जे काही विषय मांडले आणि त्यातील गैरप्रकार जनतेसमोर आणले त्याला खरोखर तोड नाही.अमीर हा खरोखर अमीर ( श्रीमंत ) आहें केवळ नावाने नव्हे तर विचाराने सुद्धा ! या अमीरचे हार्दिक अभिनंदन आणि त्याला सलाम !

10 June, 2012

गुटका आणि तंबाखू बंदी : एक स्तुत्य निर्णय

उपमुख्यमंत्री मा.अजित पवार साहेबांनी काल घोषणा केली की राज्यात गुटका आणि तंबाखू वर बंदी घालण्यात येईल.अतिशय स्वागतार्ह बाब म्हणून सर्वांनी या घोषणेचे स्वागत केले पाहिजे आणि लवकरात लवकर गुटका आणि तंबाखू या दोन गोष्टी महाराष्ट्र राज्यातून पार नाहीश्या झाल्या पाहिजेत.या अगोदरही बरेच वेळा अशी घोषणा झाली परंतु हवेतच विरघळली असे यावेळी होता कामा नये.मंत्रिमंडळात निर्णय घेताना कायद्यातील सर्व तृटींचा नीटपणे अभ्यास करून आणि कुठेही पळवाट न ठेवता हा ठराव घेण्यात यावा कारण मागच्या वेळेस या धनदांडग्या गुटका उत्पादकांनी अशा तृटींचा फायदा घेवून कोर्टां कडून या निर्णयावर स्थगिती मिळविली होती आणि जाहीर केलेली गुटका बंदी शासनाला निमुटपणे मागे घेण्यास भाग पाडले होते.
अशी बंदी घालून तोंडघशी पडण्यापेक्षा उत्पादनावरच बंदी घालून हा विषयच संपविणे शक्य होत नाही काय ?

21 May, 2012

सत्यमेव जयते !

अमीर खान यांनी सुरु केलेले सत्यमेव जयते हे सिरीयल पाहिल्यानंतर ज्याला मन आहें त्याचे डोळे पानावल्याखेरीज राहू शकत नाहीत .आजपर्यंत जे तीन एपिसोड चे विषय त्यांनी निवडले आहेत ते तीनही विषय अतिशय ज्वलंत आणि सामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत .टायटल साँग पासून ते बैठकीची ठेवण ,रंगसंगती ,बोलण्याची विशेष ढब,आणि नेमके थीम दाखविण्याची पद्धत इ.सर्व गोष्टी फारच समर्थपणे आणि परिणामकारक रीत्या पेलल्या आहेत ज्याची तारीफ केली तेवढी कमी आहें.
ह्या सिरीयल सारखे यश अशा प्रकारच्या कोणत्याही सिरीयलला इतक्या अल्पावधीत कधी मिळाले नाही.
जिकडे तिकडे फेसबुक वर,वर्तमान पत्रान्मद्धे ,नियत कालीकान्मद्धे सर्व ठिकाणी चर्चा सत्यमेव जयते चीच.
आणि या विषयांवर एवढे सारे पाहिल्यानंतर समाजात जे काही चांगले  घटक आहेत की ज्यांनी थोडेसे कष्ट घेतले तर हे सारे चित्र बदलू शकते.आणि २०-२५ % जरी बदल झाला आणि काही लोकांचे मतपरिवर्तन होवून वाईट प्रथाणा जर फाटा मिळाला तर फार मोठे यश या कार्यक्रमाला मिळाले असे सिद्ध होईल.हा कार्यक्रम तयार करण्यासाठी  फार मोठे परिश्रम घेतलेले दिसत आहेत.आज ज्यांचेकडे लग्नाची मुले किंवा मुली आहेत त्यांनी तर हा कार्यक्रम पाहणे फार गरजेचे आहें.विशेषता: मुलींच्या पालकांनी जर असे हुन्ड्याचे मागणीचे प्रकार किंवा मुलीला त्रास देण्याचे प्रकार होत असतील तर या गोष्टी कश्या प्रकारे हाताळायच्या यातून शिकता येईल.
अमीर खान आणि Reliance foundation यांचे श्रेय फार मोठे आहें यात कोणताही वादच नाही.
भारत देश हा क्रशिप्रधान आहें आणि देशातील जवळपास सत्तर टक्के लोकसंख्या या व्यवसायावर अवलंबून आहेत.मात्र त्यांच्या व्यथा या सिरीयल वाल्यांनी परिणामकारक पद्धतीने जर जगापुढे मांडला तर फार बरे होईल.
शेतकर्यांचे शोषण समाजातील सर्व घटकाकडून ,शासनाकडून कसे होते याचे जिवंत चित्रण होणे आवश्यक आहें.
पुढे मागे या सिरीयल ने हा विषय घेतला तर या शोशिताना थोडा दिलासा मिळेल.

28 April, 2012

बालपण वाचवा ...( Save Childhood )














सध्या लेक वाचवा अभियान सर्वत्र राबविले जात आहें मात्र बालपण वाचविणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहें .
भारतात बालकामगार कायदा केवळ कागदावरच आहें प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अजिबात कुठे दिसत नाही.
आपण आपल्या दैनंदिन जीवनात जिथे जिथे जातो तेथे सभोवताल सहज दृष्टीक्षेप टाकला तर आपल्याला असे दिसेल की प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बालकामगार अत्यंत तोकड्या मजुरीच्या मोबदल्यात निर्घ्णपणे राबविले जात असलेले दिसतील .
काय चूक आहें या बिचार्या चिमुकल्यां बालकांची ? त्यांचे हसण्या,बागडण्याचे,खेळण्याचे वय असताना त्याना क्रूरपणे कामावर जुंपले जात आहें .संपूर्ण भारतात या बालकामगारांची संख्या किती आहें याचा शोध घेण्याचे काम हाती घेवून जर प्रामाणिकपणे सर्वे केला तर निश्चितपणे सर्वाना आश्चर्य करण्याची वेळ येईल अशी आकडेवारी समोर येवू शकते.अनेक वर्षांपूर्वी केलेल्या बालकामगार कायद्यात संशोधन करून बालकाना कामावर ठेवणार्या संस्थाना तसेच या बालकांच्या पालकाना सुद्धा दंडित करण्याची तरतूद होणे आवश्यक आहें.
या निरागस बालकाना जेव्हा श्रीमंत कुटुंबातील त्यांच्या वयाची मुले शाळेत जाताना,खेळत असताना,किंवा बागडत असताना पाहून काय वाटत असेल हि कल्पना करवत नाही.
IPL क्रिकेट च्या संयोजकांना या खेळातून करोडो नव्हे तर अब्जो रुपये मिळतात कारण त्याशिवाय एकेका खेळाडू साठी हे लोक बोली लावून करोडो रुपयांना त्याना विकत घेतात आणि तेथे नाचणार्या चीअर गर्ल्स ना सुद्धा लाखो रुपये दिले जातात .
यापेक्षा बालकामगारांकडे लक्ष केंद्रित करून त्या बिचार्या चिमुकल्यांचे हरवलेले बालपण त्याना बहाल करण्यासाठी काही मदत केली तर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य परत आलेले पाहण्यातील आपल्याला मिळणारा आनंद क्रिकेटचा सामना पाहून मिळणार्या आनंदापेक्षा नक्कीच श्रेष्ठ असेल.नाही का ?
पहा हि छायाचित्रे आणि आपल्या काळजाचा ठोका कुठे चुकतो का ते तपासा !
                                                                         महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी
                                                                          बसमतनगर  जी.हिंगोली.
                                                                          मो. 9423141008
                                                                          blog -www.mvkapuskari.blogspot.com

27 April, 2012

राहुल गांधींचा सातारा दौरा

राहुल गांधी यांच्या सातार्याच्या दौर्यामुळे तेथील दुष्काळ एकदम नाहीसा होईल का असा प्रश्न करणेच चुकीचे आहें असे वाटते.कारण प्रत्येकाला हे माहित आहें की अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीने भेट दिल्याने तेथील दुष्काळी परिस्थिती बदलू शकत नाही. पण अशी एक व्यक्ती अशा ठिकाणी भेटीला येत आहें हि गोष्ट सुद्धा त्या व्यक्तीचे असामान्यत्व सिद्ध करून जाते.
दुष्काळी भागात स्वत: जावून तेथील पिडीत लोकांच्या वेदना जाणून घेण्याची जाणीव होणे हा संवेदनशीलतेचा भाग आहें जो की प्रत्येक नेत्यामद्धे आढळत नाही.मी व्यक्तिश: राहुल गांधी यांचा आदर करतो कारण काहीतरी वेगळेपण या तरुणात आहें.
मुंबई ला येवून लोकल ने प्रवास करणे,उपनगरातील स्टेशन समोरील ATM मधून पैसे काढणे,मजुरांसोबत काम करणे,एखाद्या गरीब नागरिकाच्या झोपडीत जाऊन रात्रभर खाटेवर झोपून मुक्काम करणे,इत्यादी गोष्टी करणे म्हणजे केवळ स्टंट करण्यासाठी आहेत हे मी मानत नाही .यासाठी एक प्रकारची जिगर लागते आणि ती जिगर गांधी घराण्यातील या तरुनामद्धे निश्चितपणे पुरेपूर आहें .
सातारा येथील दुष्काळ पिडीत लोकांच्या भावना जाणून घेवून त्यांच्यासाठी काय करता येईल अशा भावनेनेच हि भेट असावी .
                                                                         महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी
                                                                         बसमतनगर जी.हिंगोली
                                                                         मो. 9423141008  

26 April, 2012

सचिन तेंडूलकर ( खासदार )

सचिन चे हार्दिक अभिनंदन !
सचिन सारख्या निस्प्रह,कर्तबगार आणि प्रामाणिक तसेच त्याच्याकडे सोपविलेले काम पूर्ण क्षमतेने करणारया आणि विशेष म्हणजे सर्वांचा लाडका असलेल्या व्यक्तीकडे समाजाची सेवा करण्याची संधी देणार्या पंतप्रधानांच्या कार्यालयास मनापासून सलाम !
इतर कोणी तरी लोक किंवा विनोद कांबळी या त्याच्या मित्रांकडून असे मेसेज येत आहेत की त्याने राजकारणात जाऊ नये पण त्याने का जाऊ नये ?
आज देशाला सचिन सारख्या सच्च्या दिलाने काम करणार्या नेत्यांची खरी गरज आहें .
मला खात्री आहें की भारत रत्न हि पदवी देण्यापेक्षा एक खासदार म्हणून काम करण्याची संधी देणे हे केव्हाही श्रेष्ठ आहें .
सचिनला सुचना देणार्यांच्या यादीत अनेक लोक त्याच्या जवळचे असू शकतात परंतु त्याने कोणाचेही न ऐकता हि चालून आलेली संधी सोडू नये आणि या संधीचे सोने कसे करता येईल याचा सर्वांगाने विचार करावा असे वाटते.

10 April, 2012

जात प्रमाणपत्राची पडताळणी

जातीचे प्रमाणपत्र आपल्याला उपजिल्हाधिकारी कार्यालयातून दिले जाते.आणि हे देत असताना तहसीलकार्यालयामार्फत आपली सर्व कागदपत्रे तपासून पाहिली जातात आणि त्याची छाननी करून व सर्व सत्यतापडताळून पाहिली जावून आपली फाईल एकेक टेबल पुढे सरकत जाते.आणि शेवटी सर्व सोपस्कार पूर्ण करूनआपल्याला जातीचे प्रमाणपत्र दिले जाते.
आपल्याला हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही आपली फरपट संपत नाही.जेव्हा केव्हा निवडणुका येतात तेव्हा याप्रमाणपत्राची वैधता ( VALIDITY ) करून घ्यावी लागते.हे कशामुळे?
ज्या यंत्रणेद्वारे जातीचे प्रमाणपत्र दिले गेले ती यंत्रणा म्हणजे शासन.मग या शासनाच्या अधिकृत क्लास वन आणिसुपर क्लास वन अधिकार्यांनी एकेक कागदपत्रे अक्षरश:चाळणीतून तपासूनच हे प्रमाणपत्र दिले ना.... मग हियंत्रणा विश्वासार्ह नव्हे काय? जर विश्वासार्ह आहे तर मग VALIDITY कशासाठी?
जर का एखादी फाईल VALIDITY न होता लातूर येथून जर परत आली तर हे प्रमाणपत्र देणारा अधिकारी दोषीआहे असे समजावे काय?
VALIDITY चे एक टेबल जर उपजिल्हाधिकारी कार्यालयातच वाढविले तर जमणार नाही काय? काय तो येथेचफैसला होवून सामान्याची ससेहोलपट तरी होणार नाही.कारण जातीचे प्रमाणपत्र मिळविताना किती कष्ट लागतातहे प्रमाणपत्र काढ्लेल्यालाच माहित...
प्रशासनाने या बाबत जरूर सकारात्मक विचार केल्यास जनतेला नक्कीच दिलासा मिळू शकेल.
महादेव विश्वनाथ कापुसकरी

26 March, 2012

majha avadta sachinkshan

मला आठवत असलेली सचिन ची अविस्मरणीय खेळी किंवा संस्मरणीय क्षण जर विचारात घ्यावयाचा झाल्यास मला एक प्रसंग आठवतो .सचिन तेव्हा अगदी बाल्यावस्थेतून किशोरवयाकडे नुकतीच वाटचाल करीत होता . आणि भारतीय संघ पाकिस्तानच्या दौर्यांवर होता.पेशावर  येथे  हा  सामना  होता
आणि  पाउस  पडल्यामुळे  नियोजित  एकदिवसीय  अंतर  राष्ट्रीय  सामना  रद्द  केला  गेला  मात्र  संपूर्ण  stadium प्रेक्षकांनी  तुडुंब  भरल्यामुळे  एक  प्रदर्शनी  सामना  घेण्याचे  ठरले .असा हा प्रदर्शनी सामना सुरु झाला .
जेव्हा सचिन मैदानात उतरला त्यावेळी पाकिस्तानी प्रेक्षक त्याला दुधाची बाटली दाखवून हिनवीत होते .जागतिक दर्जाचा लेग स्पिनर अब्दुल कादिर गोलंदाजीला होता आणि त्याकाळी अब्दुल कादिर चा लेगस्पिन ला फेस करणे भल्या भल्या फलंदाजाना अवघड जात असे आणि फलंदाजांची हि त्रेधातीरपिट पाहताना पाकिस्तानी प्रेक्षक साहजिकच आनंद घेत होते.
सचिन ला चेंडू टाकण्यासाठी अब्दुल कादिर सज्ज झाला आणि इकडे भारतीय प्रेक्षकांचा काळजाचा ठोका चुकला कारण ह्या नावाजलेल्या लेगस्पिनर पुढे आपला सचिन कसा खेळतो हे पाहण्याची जशी उत्सुकता होती तेवढीच मनात भीतीही होती आणि त्याचे कारण म्हणजे पाकिस्तानी प्रेक्षकांची गोलंदाजाला मिळणारी चिअरिंग आणि सचिन ला दाखविली जाणारी दुधाची बाटली.
पहिला चेंडू सचिन ने पुढे येवून उचलला आणि सरळ षटकार ठोकला. तसेच दुसरया चेंडूवरही सचिन ने पुढे येवून तसाच षट्कार मारला मग मात्र सचिनला हिणवणारे प्रेक्षक थोडे शांत झाले आणि श्वास रोखून तिसर्या चेंडूची वाट पाहू लागले. तिसरा चेंडू कादिर ने टाकला आणि सचिन ने तो सुद्धा शतकारासाठी उंच हवेत फटकावला मात्र झेल उडाला आणि अजीम हाफिज ला हा झेल घेता आला नाही आणि त्याने जीवदान दिले.
त्यानंतरच्या तीन चेंडूवर सचिनने एक षटकार आणि दोन चौकार फटकावले आणि त्या षटकांत एकूण २७ धावा काढल्या गेल्या.मला वाटते की अब्दुल कादिर हे षटक आयष्यात कधीही विसरू शकणार नाही..क्षणभर धावते वर्णन करणार्या comentator चा हि गळा भरून आला आणि तो काहीच बोलू शकला नाही.
तो क्षण कोणीही विसरू शकला नाही आणि बाटली दाखविणार्या प्रेक्षकाना सचिन ने निरुत्तर केले आणि मला वाटते की आज सचिन चे महाशतक जर त्या बाटली दाखविणार्या प्रेक्षकांनी पाहिले असेल तर त्याला स्वत:ची नक्कीच लाज वाटली असेल की अरे आपण हे काय केले ....
हा सामना बहुतेक १९८९ साली खेळला गेला आणि एका षटकांत सचिन ने अब्दुल कादिर कडून २७ धावा वसूल करून डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडले.
धन्य तो सचिन तेंडूलकर....!     

                           
                                                                             महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी
                                                              द्वारा सचिन Textiles ,मेन रोड
                                                              बसमतनगर जी. हिंगोली.
                                                              मो. ९४२३१४१००८
                                                              वय -५२ वर्षे
                                                              व्यवसाय-व्यापार.  

18 February, 2012

कृषी मूल्य आयोग

दि. १८-२-२०१२ च्या Agrowon च्या मुखप्रष्ठावर कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री अशोक गुलाटी यांचे एक वक्तव्य प्रसिद्ध झाले आहे जे कि सर्व शेतकर्याना अत्यंत नाउमेद करणारे आणि निराश करणारे असे वक्तव्य आहे.देशातील समस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करायला हवा असे एक शेतकरी म्हणून मला वाटते.
" शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर देणे अशक्य आहे " असे त्यांचे वक्तव्य आहे.
जगाच्या पाठीवर जवळपास सर्वच देशांमद्धे शेतकरी आहेत.प्रमाण कमी अधिक असू शकते मात्र शेती हा सर्वत्र  व्यवसाय म्हणून केला जातो.पण भारत हा देश जगाच्या पाठीवर असा एकमेव देश असावा कि जेथे शेतकर्यांचे यथेच्छ शोषण केले जाते आणि बिचारे शेतकरी हतबल होवून सारे काही निमुत्माने सहन करतात कारण कि ते संघटीत नाहीत.
मुळात कृषी मूल्य आयोगाची स्थापना हि शेतकर्याना उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव कसे मिळतील आणि अश्या पद्धतीने भाव मिळण्याच्या कामी ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून शेतकरी कसा सुखावेल किंवा तो कसा सुस्थितीत येईल व कर्जमुक्त कसा होईल या कामासाठीच केली गेली असली पाहिजे आणि त्या दृष्टीने या आयोगाने प्रयत्नांची पराकाष्टा करावी असे अपेक्षित आहे मात्र या कार्या ऐवजी जर कृषी मूल्य आयोगाचे अद्ध्याक्शाच जर असे निराशाजनक वक्तव्य करीत असतील तर आधीच सगळीकडून खचलेला शेतकरी निराश होवून आत्महत्त्या करणार नाही तर कशाच्या आधारावर जगेल ?
गेल्या ४-५ वर्षांपासून प्रत्येक वर्षी वाढत चाललेले रासायनिक खतांचे भाव,दरवर्षी वाढत चाललेले बी-बियाण्यांचे भाव,दरवर्षी बेसुमार वाढत जाणारे मजुरांचे दर आणि दरवर्षी उतरत चाललेले कृषिमालाचे भाव या बाबी चा सर्वंकष विचार केला तर कृषी मूल्य आयोगाने कृषी उत्पादनांची आधारभूत किमत कोणत्या पद्धतीने काढली आहे याचा संब्र्हम वाटतो.या समितीमद्धे प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी (वातानुकुलीत केबिन मद्धे बसून नावाला शेतकरी म्हणविणारे नव्हेत )समाविष्ट केले जातात किंवा नाही आणि जर ते असतील तर आधारभूत मूल्य नक्कीच योग्य निघू शकते .
शेतकरी तोट्यात आहेत हे अशोक गुलाटी हि मान्य करतात.मात्र हा तोटा भरून काढण्यासाठी सरकारने आर्थिक मदत करावी असे त्यांचे म्हणणे आहे.
माझ्या मते हि सरकारी मदत देण्यापेक्षा अर्थसंकल्पातील शेतीसाठी असलेली आर्थिक तरतूद फार मोठ्या प्रमाणावर वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.जेव्हा देशातील ७०% लोक हे शेतीवर अवलंबून असताना शेतीसाठी शेतीसाठी अर्थसंकल्पात किती तरतूद आहे हे सर्व शेतकऱ्यांनी संघटीत होवून अभ्यास करणे गरजेचे आहे .
शेतकर्यांचे नेते राजू शेट्टी ,पाशा पटेल,शरदजी जोशी याना समस्त शेतकऱ्यांतर्फे विनंती आहे कि मागे उसाच्या भावासाठी जसे आक्रमक होवून लढा दिला त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर लढा  उभारून या असंघटीत वर्गाला आणि निष्पाप आणि मेहनत करून प्रामाणिकपणे जगणारया बळीराजाला न्याय मिळवून द्यावा.
अर्थशास्त्राचा नियम,मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ इत्यादी गोष्टींशी शेतकर्याला कसलेही देणे घेणे नाही पण जसे इतर कोणत्याही उत्पादनाचे मूल्य ठरविण्याचे अधिकार त्या त्या वस्तूच्या उत्पादकाला असतो तसा अधिकार म्हणजे जेवढा खर्च त्या पिकावर शेवटपर्यंत झालेला आहे त्यावर शेतकर्याचा नफा लावून त्याला त्याचे मूल्य मिळाले पाहिजे.आणि जेव्हा अश्या प्रकारच्या नफ्याच्या शाश्वततेची हमी शेतकर्याला मिळेल तेव्हा हा बळीराजा नव्या जोमाने कृशीतून उत्पन्न काढून दाखवील आणि हा जोम यशस्वी झाल्यास जगात आर्थिक महासत्ता आपण होवून भारतात चालत येईल.आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत या बळीराजाला सुखी झालेले पाहण्यापासून आपण वंचीत  राहू असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
                                                                                                       महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी
                                                                                                       बसमतनगर जी.हिंगोली
                                                                                                       मोब.९४२३१४१००८

02 January, 2012

जन्म हा अखेरचा

जगदगुरू रेनुकाचार्य आणि अगस्त्यमुनी यांच्यातील संवादातून श्रीसिद्धान्तशिखामनी हा मौलिक ग्रंथ तयार झाला.रेनुकाचार्य हे शिवगनातील प्रमुख रेनुकगण होते.आणि शिवाच्या आज्ञेने ते मनुष्यलोकी अवतीर्ण झाले.
श्रीसिद्धांत शिखामणी या ग्रंथावर अभ्यासपूर्ण अशी आशिर्वचने डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केली ,या सर्व आशीर्वचनांचे संकलन म्हणजे " जन्म हा अखेरचा " .
डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांची विद्वत्ता त्यांच्या प्रत्येक  आशीर्वचनातून  प्रकर्षाने जाणवते.
अवघड सिद्धांत साध्या आणि सरळ भाषेत समजावून सांगणे म्हणजे सोपे काम नव्हे.
गेल्या अनेक दिवसांपासून मी जन्म हा अखेरचा या ग्रंथाबद्दल ऐकून होतो परंतु प्रत्यक्ष वाचण्याचा योग आला नव्हता.परंतु मागील सोमवारी गुरुवर्यांनी ( श्री करबसव शिवाचार्य स्वामी )मंगल आरतीनंतर कोणत्याही सामाजिक किंवा धार्मिक विषयावर काही तरी बोलण्याचा आदेश दिला.आणि मला हा ग्रंथ वाचून त्यातील काही मुद्द्यांवर आपण बोलूया असा विचार मनात आला.आणि त्यानंतर हा ग्रंथ कुठे मिळेल अशी विचारणा मी योगेश महाजन यांचेकडे केली.परंतु घरी विचारणा केली असता पत्नीने सांगितले कि अहो हा ग्रंथ आपल्या घरी आहें !
त्यामुळे इतरत्र पाहण्याची काहीच गरज नाही.मला साहजिकच आनंद झाला.
मी जेव्हा या ग्रंथाचे वाचन करत असताना २५-३० पाने वाचून झाल्यानंतर तेव्हा मला स्वत:चाच राग आला कि आजपर्यंत हा ग्रंथ आपण का वाचला नाही ?
असे जाणवले कि या ग्रंथात एवढे अगाध ज्ञान आणि शास्त्रोक्त सुविचार उपलब्ध आहेत कि आपण या गोष्टींवर काही बोलू शकू इतकी विद्वत्ता आपल्याकडे नक्कीच नाही अशी मला जाणीव झाली.एवढ्या गहन आणि महत्वपूर्ण विषयावर बोलण्यासाठी जे प्रभुत्व लागते ते आपल्याकडे नाही अशी जाणीव मला झाली.
मात्र प्रत्येकाने हा पूर्ण ग्रंथ वाचावा असे मात्र मला मनापासून वाटते.
वर्तमानातील सारी शास्त्रे इंद्रिय सुखे व स्वार्थासाठी माणसास जोडतात त्यामुळे माणसाची वाटचाल पशुत्वाच्या दिशेने सुरु झाली आहें .मनुष्याला मनुष्यत्व सांभाळता नाही आले तर तो शिवत्व कसे मिळवणार ?
भक्त होणे हे मनुष्यत्वाचे लक्षण आहें,भक्त होताच स्वार्थ आणि सुखलोलुपता गळून जाते व शरनता येते.
हा ग्रंथ सदगुणपठ  दाखवून पूर्णता,सुशांती देणारा आहें.
डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामिजी यांची प्रवचने अनेक मराठी वाचकांपर्यंत पोचविण्याचे श्रेय डॉ.शे.दे.पसारकर याना जाते.त्यांनी स्वामीजींच्या आशीर्वाचानांची तीअपणे काढून त्यांचे संकलन करून भाषांतर केले.ख्यातनाम पत्रकार तथा व्याख्याते विवेक घळसासी यांनी केलेल्या प्रस्तावनेत ते म्हणतात कि जन्माने वीरशैव असण्याचे  भाग्य लाभलेल्यासांठी दोन शब्द लिहिले पाहिजे.व्यापार,उद्योग,शेती,नोकरीपेशा,यामुळे वीरशैव हे सक्षम आहेत.
मी माझ्या शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत आणि त्यानंतरही अनेक पुस्तके वाचली मात्र जन्म हा अखेरचा या ग्रंथाचे वाचन म्हणजे एक अविस्मरणीय आनंद देणारा सुखद अनुभव आहें असे मला वैयक्तिकरित्या  वाटते.आणि प्रत्येकाने हा ग्रंथ जरूर वाचावा असे मला मनापासून वाटते.मी स्वत: माझे गुरु श्री करबसव शिवाचार्य स्वामी आणि भूषण महाराज वाखारीकर यांचा अत्यंत आभारी आहें कारण त्यांनी मला हा ग्रंथ वाचण्यासाठी प्रेरणा  दिली.