उपमुख्यमंत्री मा.अजित पवार साहेबांनी काल घोषणा केली की
राज्यात गुटका आणि तंबाखू वर बंदी घालण्यात येईल.अतिशय स्वागतार्ह बाब
म्हणून सर्वांनी या घोषणेचे स्वागत केले पाहिजे आणि लवकरात लवकर गुटका आणि
तंबाखू या दोन गोष्टी महाराष्ट्र राज्यातून पार नाहीश्या झाल्या पाहिजेत.या
अगोदरही बरेच वेळा अशी घोषणा झाली परंतु हवेतच विरघळली असे यावेळी होता
कामा नये.मंत्रिमंडळात निर्णय घेताना कायद्यातील सर्व तृटींचा नीटपणे
अभ्यास करून आणि कुठेही पळवाट न ठेवता हा ठराव घेण्यात यावा कारण मागच्या
वेळेस या धनदांडग्या गुटका उत्पादकांनी अशा तृटींचा फायदा घेवून कोर्टां
कडून या निर्णयावर स्थगिती मिळविली होती आणि जाहीर केलेली गुटका बंदी
शासनाला निमुटपणे मागे घेण्यास भाग पाडले होते.
अशी बंदी घालून तोंडघशी पडण्यापेक्षा उत्पादनावरच बंदी घालून हा विषयच संपविणे शक्य होत नाही काय ?
अशी बंदी घालून तोंडघशी पडण्यापेक्षा उत्पादनावरच बंदी घालून हा विषयच संपविणे शक्य होत नाही काय ?
No comments:
Post a Comment