राज्यसभेत भाषण देण्यासाठी अमीर खान ला आमंत्रण देण्यात आले हि खरोखरच एक
आनंदाची आणि चांगली बातमी आहें.परंतु त्याचबरोबर एका गोष्टीचे अत्यंत
वैषम्य वाटते की वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकार राज्यसभेत उघडकीस
आणण्यासाठी एका चित्रपट कलावंताला पाचारण करावे लागते हि गोष्ट कुठेतरी
मनाला वेदना देते.कारण की आपले राज्यसभेचे एकूण सदस्य आणि लोकसभेचे एकूण
सदस्य या पैकी एकही सदस्य ह्या गैरप्रकाराचा सखोल अभ्यास करून त्यावर भाषण देवू शकत नाही काय ?
किंवा लोकसभेचे सभापती किंवा राज्यसभेचे सभापती स्वत: ह्या विषयावर विशेष अभ्यास करून या क्षेत्रातील सर्व गैरप्रकार उघडकीस आणू शकले असते तर भारतीय संसदेचा आदर सामान्य नागरिकांच्या मनात नक्कीच दुणावला असता असे वाटते.
सत्यमेव जयते द्वारे आजपर्यंत अमीर खान ने जे काही विषय मांडले आणि त्यातील गैरप्रकार जनतेसमोर आणले त्याला खरोखर तोड नाही.अमीर हा खरोखर अमीर ( श्रीमंत ) आहें केवळ नावाने नव्हे तर विचाराने सुद्धा ! या अमीरचे हार्दिक अभिनंदन आणि त्याला सलाम !

No comments:
Post a Comment