जगदगुरू रेनुकाचार्य आणि अगस्त्यमुनी यांच्यातील संवादातून श्रीसिद्धान्तशिखामनी हा मौलिक ग्रंथ तयार झाला.रेनुकाचार्य हे शिवगनातील प्रमुख रेनुकगण होते.आणि शिवाच्या आज्ञेने ते मनुष्यलोकी अवतीर्ण झाले.
श्रीसिद्धांत शिखामणी या ग्रंथावर अभ्यासपूर्ण अशी आशिर्वचने डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केली ,या सर्व आशीर्वचनांचे संकलन म्हणजे " जन्म हा अखेरचा " .
डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांची विद्वत्ता त्यांच्या प्रत्येक आशीर्वचनातून प्रकर्षाने जाणवते.
अवघड सिद्धांत साध्या आणि सरळ भाषेत समजावून सांगणे म्हणजे सोपे काम नव्हे.
गेल्या अनेक दिवसांपासून मी जन्म हा अखेरचा या ग्रंथाबद्दल ऐकून होतो परंतु प्रत्यक्ष वाचण्याचा योग आला नव्हता.परंतु मागील सोमवारी गुरुवर्यांनी ( श्री करबसव शिवाचार्य स्वामी )मंगल आरतीनंतर कोणत्याही सामाजिक किंवा धार्मिक विषयावर काही तरी बोलण्याचा आदेश दिला.आणि मला हा ग्रंथ वाचून त्यातील काही मुद्द्यांवर आपण बोलूया असा विचार मनात आला.आणि त्यानंतर हा ग्रंथ कुठे मिळेल अशी विचारणा मी योगेश महाजन यांचेकडे केली.परंतु घरी विचारणा केली असता पत्नीने सांगितले कि अहो हा ग्रंथ आपल्या घरी आहें !
त्यामुळे इतरत्र पाहण्याची काहीच गरज नाही.मला साहजिकच आनंद झाला.
मी जेव्हा या ग्रंथाचे वाचन करत असताना २५-३० पाने वाचून झाल्यानंतर तेव्हा मला स्वत:चाच राग आला कि आजपर्यंत हा ग्रंथ आपण का वाचला नाही ?
असे जाणवले कि या ग्रंथात एवढे अगाध ज्ञान आणि शास्त्रोक्त सुविचार उपलब्ध आहेत कि आपण या गोष्टींवर काही बोलू शकू इतकी विद्वत्ता आपल्याकडे नक्कीच नाही अशी मला जाणीव झाली.एवढ्या गहन आणि महत्वपूर्ण विषयावर बोलण्यासाठी जे प्रभुत्व लागते ते आपल्याकडे नाही अशी जाणीव मला झाली.
मात्र प्रत्येकाने हा पूर्ण ग्रंथ वाचावा असे मात्र मला मनापासून वाटते.
वर्तमानातील सारी शास्त्रे इंद्रिय सुखे व स्वार्थासाठी माणसास जोडतात त्यामुळे माणसाची वाटचाल पशुत्वाच्या दिशेने सुरु झाली आहें .मनुष्याला मनुष्यत्व सांभाळता नाही आले तर तो शिवत्व कसे मिळवणार ?
भक्त होणे हे मनुष्यत्वाचे लक्षण आहें,भक्त होताच स्वार्थ आणि सुखलोलुपता गळून जाते व शरनता येते.
हा ग्रंथ सदगुणपठ दाखवून पूर्णता,सुशांती देणारा आहें.
डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामिजी यांची प्रवचने अनेक मराठी वाचकांपर्यंत पोचविण्याचे श्रेय डॉ.शे.दे.पसारकर याना जाते.त्यांनी स्वामीजींच्या आशीर्वाचानांची तीअपणे काढून त्यांचे संकलन करून भाषांतर केले.ख्यातनाम पत्रकार तथा व्याख्याते विवेक घळसासी यांनी केलेल्या प्रस्तावनेत ते म्हणतात कि जन्माने वीरशैव असण्याचे भाग्य लाभलेल्यासांठी दोन शब्द लिहिले पाहिजे.व्यापार,उद्योग,शेती,नो करीपेशा,यामुळे वीरशैव हे सक्षम आहेत.
मी माझ्या शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत आणि त्यानंतरही अनेक पुस्तके वाचली मात्र जन्म हा अखेरचा या ग्रंथाचे वाचन म्हणजे एक अविस्मरणीय आनंद देणारा सुखद अनुभव आहें असे मला वैयक्तिकरित्या वाटते.आणि प्रत्येकाने हा ग्रंथ जरूर वाचावा असे मला मनापासून वाटते.मी स्वत: माझे गुरु श्री करबसव शिवाचार्य स्वामी आणि भूषण महाराज वाखारीकर यांचा अत्यंत आभारी आहें कारण त्यांनी मला हा ग्रंथ वाचण्यासाठी प्रेरणा दिली.
श्रीसिद्धांत शिखामणी या ग्रंथावर अभ्यासपूर्ण अशी आशिर्वचने डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केली ,या सर्व आशीर्वचनांचे संकलन म्हणजे " जन्म हा अखेरचा " .
डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांची विद्वत्ता त्यांच्या प्रत्येक आशीर्वचनातून प्रकर्षाने जाणवते.
अवघड सिद्धांत साध्या आणि सरळ भाषेत समजावून सांगणे म्हणजे सोपे काम नव्हे.
गेल्या अनेक दिवसांपासून मी जन्म हा अखेरचा या ग्रंथाबद्दल ऐकून होतो परंतु प्रत्यक्ष वाचण्याचा योग आला नव्हता.परंतु मागील सोमवारी गुरुवर्यांनी ( श्री करबसव शिवाचार्य स्वामी )मंगल आरतीनंतर कोणत्याही सामाजिक किंवा धार्मिक विषयावर काही तरी बोलण्याचा आदेश दिला.आणि मला हा ग्रंथ वाचून त्यातील काही मुद्द्यांवर आपण बोलूया असा विचार मनात आला.आणि त्यानंतर हा ग्रंथ कुठे मिळेल अशी विचारणा मी योगेश महाजन यांचेकडे केली.परंतु घरी विचारणा केली असता पत्नीने सांगितले कि अहो हा ग्रंथ आपल्या घरी आहें !
त्यामुळे इतरत्र पाहण्याची काहीच गरज नाही.मला साहजिकच आनंद झाला.
मी जेव्हा या ग्रंथाचे वाचन करत असताना २५-३० पाने वाचून झाल्यानंतर तेव्हा मला स्वत:चाच राग आला कि आजपर्यंत हा ग्रंथ आपण का वाचला नाही ?
असे जाणवले कि या ग्रंथात एवढे अगाध ज्ञान आणि शास्त्रोक्त सुविचार उपलब्ध आहेत कि आपण या गोष्टींवर काही बोलू शकू इतकी विद्वत्ता आपल्याकडे नक्कीच नाही अशी मला जाणीव झाली.एवढ्या गहन आणि महत्वपूर्ण विषयावर बोलण्यासाठी जे प्रभुत्व लागते ते आपल्याकडे नाही अशी जाणीव मला झाली.
मात्र प्रत्येकाने हा पूर्ण ग्रंथ वाचावा असे मात्र मला मनापासून वाटते.
वर्तमानातील सारी शास्त्रे इंद्रिय सुखे व स्वार्थासाठी माणसास जोडतात त्यामुळे माणसाची वाटचाल पशुत्वाच्या दिशेने सुरु झाली आहें .मनुष्याला मनुष्यत्व सांभाळता नाही आले तर तो शिवत्व कसे मिळवणार ?
भक्त होणे हे मनुष्यत्वाचे लक्षण आहें,भक्त होताच स्वार्थ आणि सुखलोलुपता गळून जाते व शरनता येते.
हा ग्रंथ सदगुणपठ दाखवून पूर्णता,सुशांती देणारा आहें.
डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामिजी यांची प्रवचने अनेक मराठी वाचकांपर्यंत पोचविण्याचे श्रेय डॉ.शे.दे.पसारकर याना जाते.त्यांनी स्वामीजींच्या आशीर्वाचानांची तीअपणे काढून त्यांचे संकलन करून भाषांतर केले.ख्यातनाम पत्रकार तथा व्याख्याते विवेक घळसासी यांनी केलेल्या प्रस्तावनेत ते म्हणतात कि जन्माने वीरशैव असण्याचे भाग्य लाभलेल्यासांठी दोन शब्द लिहिले पाहिजे.व्यापार,उद्योग,शेती,नो
मी माझ्या शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत आणि त्यानंतरही अनेक पुस्तके वाचली मात्र जन्म हा अखेरचा या ग्रंथाचे वाचन म्हणजे एक अविस्मरणीय आनंद देणारा सुखद अनुभव आहें असे मला वैयक्तिकरित्या वाटते.आणि प्रत्येकाने हा ग्रंथ जरूर वाचावा असे मला मनापासून वाटते.मी स्वत: माझे गुरु श्री करबसव शिवाचार्य स्वामी आणि भूषण महाराज वाखारीकर यांचा अत्यंत आभारी आहें कारण त्यांनी मला हा ग्रंथ वाचण्यासाठी प्रेरणा दिली.
No comments:
Post a Comment