लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी १८९३ मद्धे गणेशोत्सवाला
सार्वजनिक स्वरूप देवून त्याचे पुनुरुज्जीवन केले .यापूर्वी गणेशोत्सव हे
घरोघर खाजगी रुपात होत असत मात्र टिळकांनी त्याला १० दिवसांचे सार्वजनिक
स्वरूप दिले.त्यामागे त्यांचे दोन उद्देश होते.एक म्हणजे या उत्सवाने
ब्रिटीश विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि दुसरे म्हणजे
याद्वारे समस्त हिंदू समाज एकत्र येवून त्यांच्यातील एकोपा वाढावा आणि
एकमेकांच्या विचारांची देवान घेवाण व्हावी.त्यानिमित्ताने त्यांनी अनेक
ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात व्याख्यानमाला आयोजित करून समाजात एका नवीन
दिशा दर्शक उपक्रमाची सुरुवात केली.
परंतु जसजसा काल बदलत गेला तसे गणेशोत्सवाचे स्वरूपही बदलत गेले आणि विशेषत: युवावर्ग या उत्सवात मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाला आणि या उत्सवातील व्याख्यानमाला आणि कौटुंबिक नाटके इत्यादी प्रकार मागे पडून त्याजागी चित्रपटातील भडक स्वरूपातील गाण्यावर नाच करणे ,दारू पिवून धांगड धिंगा करणे ,गणेश मूर्ती पुढे जुगार खेळणे जमा झालेल्या प्रचंड वर्गणीची उधळपट्टी करणे असे प्रकार चालू झाल्यामुळे अनेक ठिकाणी खरे गणेश भक्त बाजूलाच रहात आहेत.अर्थात ह्या गोष्टी सर्वच ठिकाणी नाहीत ,अनेक ठिकाणी अजूनही चांगले उपक्रम अवश्य घेतले जातात मात्र हे प्रमाण कमी आहें.
मात्र दुर्दैवाने असे म्हणावे लागेल की लोकमान्य टिळकांचा एवढा चांगला उदात्त हेतू हा काळाआड जावू पहात आहें आणि या वेगवान आणि संगणकीय युगात नवीन प्रवाह येवू पहात आहेत .
महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी
बसमतनगर जी. हिंगोली.

No comments:
Post a Comment