एका दैनिकात वाचकाने परवाच झालेल्या एका मौंजीच्या कार्यक्रमाबद्दल "श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन "याशीर्षाकातून आपली चीड व्यक्त केली आहे.व ही चीड येणे साहजिकच आहे.कारण दुबईत राहणार्या या भारतियाणेएका जेट विमानात जमिनिपासून सुमारे दहा हजार की.मी.इतक्या उंचीवर आपल्या मुलाची मौंजलावली.आपणास आठवतच असेल की मागील वर्षी भारतातील प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यानी आपल्यापत्नीला 250 कोटी रुपयांचे एक जेट विमान भेट दिले.व यावर कडी म्हणून की काय त्यांचे बंधू अनिल अंबानी यानीआपल्या पत्नीला परवाच 400 कोटी रुपयांचे एक मोठे जहाज भेट दिल्याचे वर्तमानपत्रातून कळले.हे सुद्धा श्रीमंतीचेओंगळ प्रदर्शन नव्हे काय?भारत देशा एवढी आर्थिक विषमता जगात कोठेही नसावी असे वाटते.मूठभर 5 ते 7 टक्के लोकांकडे देशातील 80 टक्के पैसा आणि उर्वरित 93 टक्के लोकांकडे 20 टक्के पैसा .दोघाही अंबानी बांधूंवरटीका अजिबात करायची नाही कारण हे दोघेही आपापल्या बुद्धीच्या जोरावर कमाई करीत आहेत याबद्दल कसलेहीदुमत नाही परंतु आपल्या श्रीमंतीचे असे ओंगळ प्रदर्शन करू नये असे वाटते.                                                                                          महादेव विश्वनाथ कापुसकरीबसमतणगर जी.हिंगोली 

 
 
1 comment:
मी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे. अश्या श्रीमंतानी समाज कार्यासाठी आपल्या संपत्तिचा वापर करावा.
Post a Comment