Powered By Blogger

12 December, 2008

" महागडे शिक्षण "

नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका सर्वेनुसार भारतात केवळ दहा टक्के तरुण उच्च शिक्षणापर्यंत आपलेमार्गक्रमण करू शकतात.ही आकडेवारी सर्व राजकारणी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मंडळिना गंभीरपणेविचार करायला लावणारी आहे.आज उच्च शिक्षण हे इतके महागडे झाले आहे की सर्वसामान्यानाच नव्हे तरमद्ध्यामवर्गीयानासुद्धा मूलाना उच्च शिक्षण देण्यासाठी महटप्रयास करावे लागत आहेत.उच्च शिक्षण हे स्वस्तकसे करता येईल याचा राज्यकर्त्यानी अग्रक्रमाने विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.भारतात बुद्धिमत्ता फारमोठ्या प्रमाणावर आहे मात्र आर्थिक दुर्बालतेमुळे ही बुद्धिमत्ता जागेवरच जंग खात पडत आहे.5-7 टक्के (मूठभर) लोकांकडे देशातील 90 टक्के पैसा आणि उर्वरित 93 टक्के लोकांकडे 10 टक्के पैसा अशी विषमता जगाच्यापाठीवर इतरत्र कोठेही नसावी.भ्रष्ट व मुजोर नोकरशाही सामान्य नागरिकाणा पिळून काढत आहे.निवडणुकीतझालेला खर्च व्याजासहित काढणारे राजकीय नेते पैसे वेगाने जमा करता करता इतर कामे कशी काय लक्षातठेवणार?जाहीरणाम्यात जाहीर केलेली आश्वासने पूर्ण करण्याची बंधने निवडणूक आयोगाने त्या त्या पक्षावरकठोरपणे लादली पाहिजेत.तसेच जर सदर आश्वासनांची पूर्तता झाली नाही म्हणून सामान्य नागरिकाणा निवडूनआलेल्या उमेदवारास परत बोलविण्याचा हक्क निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मिळाला पाहिजे.

1 comment:

विशाखा said...

Barobar ahe! Pan shikshanat paishyapeksha jast changlya shikshan-paddhatinchi garaj ahe.

Tumhala ha blog avadu shakto-

http://http://blumenkranz.blogspot.com/