बेळगाव मधील मराठी भाषिक आणि कानडी या दोघांच्या वादावरून दोन्ही राज्यांमद्धे जी मोडतोड चालू आहे तो
प्रकार म्हणजे फार दुर्दैवी आहे.महाराष्ट्रीय लोकाणी कर्नाटक बँकेवर दगडफेक करणे व कर्नाटकी लोकाणी महाराष्ट्र
बँकेवर दगडफेक करणे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे किंवा आपण आपल्याच नोटा फाडून टाकणे असा प्रकार
आहे.जर बेळगाव महाराष्ट्रात सामील केले तर काय फायदा होणार आहे? महाराष्ट्रातील रस्ते सुधारतील?,अनेक
खेड्यांमद्धे पिण्याचे पाणी नाही तेथे पाणी येईल?,अनेक बेकार फिरत आहेत त्याना रोजगार मिळेल?,विजेचा
प्रश्न सुटण्यास मदत होईल?जागोजागी होणारा भ्रष्टाचार नष्ट होईल? आज भेडसावणारा वाढत्या लोकसंख्येचा
प्रश्न सुटेल? या सर्व प्रश्नांवर जर तोडगा निघत असेल तर अवश्य बेळगावला महाराष्ट्रात घेण्यासाठी संघर्ष करावा.
आपल्या समोर आज लोकांच्या जिव्हाळ्याचे असंख्य प्रश्न अणूत्तरीत असताना लोकांचे लक्ष निरर्थक बाबींकडे
वाळविणार्या स्वार्थी राजकारणी लोकापासून सामान्यांनि दूर राहीले तरच आपली जीवन मूल्य आपण सुधारू
शकू.माझ्या एका मित्राची सासर वाडि कर्नाटक मधील बेळगाव ही आहे.मग त्याने महाराष्ट्र कर्नाटक वादात बायको
सोडून द्यावी? आपण अमेरिकेची राष्ट्राध्यक्षाची निवडणूक पाहिली.ओबामा यानी त्यांच्या प्रचारात कोठेही असेम्हटले नाही की
मला निवडल्यास मी काळ्या लोकांसाठी शासकीय नोकर्यामद्धे अमुक अमुक टक्के आरक्षण देईन,मी शेतकर्यांची
वीज माफ करीन,मी त्यांचे सर्व कर्ज माफ करीन व सातबारा कोरा करीन,बचत गाटां ना कमी व्याजदराने कर्जदेईन.
कुठे तो शपथ ग्रहण सोहळ्याचा नजरेचे पारणे फेडनारा कार्यक्रम ? विस लाख नागरिक आणि कमालीची शांतता .
नाहीतर आपलेकडे मुंबईला कुठलासा मोर्चा असला की चलो मुंबई म्हणत बिगर तिकीट असंख्य जमाव रेल्वेतआरक्षित
सीट आणि बर्थ वर ताबा मिळविण्यात फार मोठा बहुमान समजतात. 1942 साली ईंग्लंड चे पंतप्रधान विन्स्टनचर्चिल
यानी म्हटले होते की भारत देशाला कशाला स्वातंत्र्य हवे?स्वातंत्र्य कशाशी खातात हे त्याना माहीत नाही.
आज आपणास स्वतंत्र होऊन 60 वर्षे होत आहेत .परंतु आपण आपल्यात आपणच एकमेकांशी भांडत आहोत हेपाहून
विन्स्टन चर्चिल यांचे विधान खरेच होते असे वाटते.
3 comments:
kaay rajaseth...kaay chalalay..?
karnatakach kaay kaam kadhalay./
Thanks for comment.
Kkharach aahe tumhi mhanata te. He sarw rajkarani lokanche khel aahet. Mhanatat nma votanche rajkaran.
Post a Comment