Powered By Blogger

04 January, 2009

स्त्री

सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री जीवन सुधारण्यासाठी केलेल्या संघर्शाबद्दल आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्यालक्षात येते की त्या काळी त्याना हा लधा देण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला असेल ?मात्र आजची स्त्री सुद्धाकिती सुरक्षित आहे ? देशातील गुन्हेगारिचे प्रमाण पाहिले तर स्त्रियांचे शोषण चे प्रमाण सर्वाधिक दिसेल .त्यातहीविशेष म्हणजे लोक लज्जेस्तव अनेक गुन्हे नोंदविलेच जात नाहित त्यामुले स्त्रियाविशयिन्च्या गुन्ह्यांची खरीआकडेवारी समजूनच येत नाही .कधी कधी मनाशी स्त्रियांच्या या खडतर जीवन प्रवासाबद्दल विचार केला तर असेवाटते की खरोखरच स्त्री जीवन हा एक फार मोठा जुगार आहे. आयुष्यभर स्त्री या प्रवासातीलखाचखाल्गे,अत्याचार,अपमान,शोषण या सर्व गोष्टींचा मुकाबला कसा काय करीत असेल ते देवच जाने! स्त्री हीआयुष्यभर कशी परावलम्बी आहे हे पहावयाचे झाल्यास बाल पनी पित्याच्या अधिपत्याखाली, तरुणपनी पतीच्याअधिपत्याखाली आणि वृद्धअवस्थेत पुत्राच्या अधिपत्याखाली तिला आपले आयुष्य काढावे लागते। जरी आर्थिकदृष्टया स्वावलंबी असली तरीही तिला घरात पुरुशासमान स्थान दिले जात नाही तरीही जगाला एक गोष्ट मान्यकरावीच लागेल की स्त्री मद्धे बालिकेच्या भूमिकेत निरागसता,प्रेयसी किंवा पत्नीच्या भूमिकेत प्रेम,मातेच्या भूमिकेत वात्सल्य या अश्या तिहेरी भूमिकेतुन स्वतः चे अस्तित्व सिद्ध करण्याची निसर्गतः शक्ति आहेच.

No comments: