14 September, 2011

द्विपक्षीय निवडणूक पद्धत असावी


खरे तर भारतासारख्या विशालप्राय देशात इंग्लंड प्रमाणे लोकशाही असावी जेथे Democratic party आणि Republican party अशा दोनच पक्षांच्या फळ्या असाव्यात असे मला प्रामाणिकपणे वाटते.
आपल्या भारत देशात अनेक प्रादेशिक पक्ष असल्यामुळे निवडणुकीत मतदान करताना लोकाना विविध अनेक पर्याय असतात.काही लोक पक्षाचे कार्य न पाहता धार्मिक पातळीवर असलेल्या धोरणाप्रमाणे तर काही लोक जातीपातीच्या पातळीवरील धोरणाप्रमाणे मतदान करतात त्यामुळे एखाद्या विशिष्ट पक्षाचे बहुमत न येता त्रिशंकू अवस्थेत निकाल येतात आणि अनेक पक्षांची मदत घेवून सरकार तयार करावे लागते.ज्यामुळे ह्या सरकारला काही धोरणात्मक निर्णय घेताना या सर्वच लोकांचा विचार त्यावर घ्यावा लागतो.दुसरे म्हणजे विरोधी पक्षातही अनेक पक्षाचे लोक असल्यामुळे त्यांच्यातही अनेक प्रकारचे मतभेद असतात त्यामुळे त्यांच्यातही बळकटी येत नाही.
या सर्व गोष्टींमुळे हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष हे दोनच पक्ष असले पाहिजेत जेणेकरून सत्तेवर असलेला एक पक्ष आणि उर्वरित पक्ष म्हणजे विरोधी पक्ष असे स्वरूप असेल त्यामुळे विरोधी पक्षसुद्धा बळकट असेल त्यामुळे सत्तेवरील पक्षाला स्वैर वागता येणार नाही कारण वेसन विरोधी पक्षाकडे असेल.
देशातील सर्व बुद्धीजीवी वर्ग,सुजाण नागरिक,ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक,समाजसेवक इ.लोकांनी सर्वंकष विचारविनिमय करून असे जर करता आले तर हा भारत देश जगाच्या पाठीवर आपले सार्वभौमत्व निर्विवाद सिद्ध करू शकेल यात तिळमात्र शंका वाटत नाही.

No comments: