नुकतेच बारावी चे निकाल जाहीर झाले आणि दहावी चे सुद्धा लवकरच होणार
आहेत असे प्रसिद्ध झाले आहे. दहावी नंतर आणि बारावी नंतर विद्यार्थ्याना कोणकोणते कोर्सेस
उपलब्ध आहेत? आणि किती टक्के मार्क्स च्या विद्यार्थ्यांनी कोणत्या कोर्सेस
साठी प्रयत्न करावेत यासाठी त्याना मार्गदर्शन तज्ञ लोकांकडून विस्तृत प्रमाणात दूरदर्शन
वरून होणे गरजेचे आहे कारण आजचे सर्वच पालक हे याबाबतची पूर्ण माहिती
असणारे नसतात आणि विशेषत: ग्रामीण भागातील पालक हे तर नवीन नवीन निघालेल्या
अनेक व्यावसायिक कोर्सेस बद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असतात. या सर्वाना योग्य
मार्गार्षानाची नक्कीच गरज असते. परंतु आज आपण पहात आहोत कि जवळपास सर्व
वाहिन्या वर IPL चे फिक्सिंग,श्रीनिवासन चा राजीनामा ,दालमियाची नियुक्ती,शरद पवारांची मानहानी ,अनेकांनी व्यक्त
केलेली याबाबतची मते,,इत्यादी इत्यादी वर चर्चा आणि
बातम्या देण्याची मोठ्या प्रमाणावर चढाओढ लागलेली आहे असे चित्र दिसते.
वास्तविक क्रिकेट ला किती महत्व द्यावे हे ठरविण्याची आज वेळ आली आहे.
क्रिकेट पेक्षा आपल्या शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश
करणार्या युवकाला आणि देशाच्या भावी आधार स्तंभाला पूर्ण आणि सविस्तर
मार्गदर्शनाची गरज असून आजचे गब्बर शिक्षण सम्राट हे जबर फी आकारून या
तरुणांना पद्धतशीरपणे फसवणूक करतात आणि बिचारे पालक इकडून तिकडून मोठ्या
कष्टाने जमविलेले सर्व पैसे या निगरगट्ट झालेल्या संस्था चालकांच्या घशात
घालून मोकळे होतात. पण सर्व सविस्तर माहिती घेवून जर प्रवेश घेण्याचे
ठरविले तर नक्कीच या सर्व गैर्प्रकाराना आळा बसू शकतो. त्यासाठी सर्व पालक
आणि विद्यार्थी या दोघांनीही घाई न करता शांतपणे सर्व माहिती घेवूनच पुढचे
पाउल उचलावे आणि होणारी फसवणूक टाळावी .
महादेव विश्वनाथ कापुसकरी
03 June, 2013
25 May, 2013
क्रिकेट मधील फिक्सिंग आणि प्रेक्षक
I P L ची
फिक्सिंग नुकतीच उजेडात आलेली आपण म्हणजेच सर्व क्रिकेट प्रेमींनी वर्तमान
पत्रातून आणि दूरदर्शन वर पहिलीच असेल. किती हे पैशासाठी नैतिक अध:पतन
म्हणायचे ?
17 May, 2013
30 March, 2013
संजय दत्त यांच्या शिक्षेत माफी देणे योग्य कि अयोग्य ?
सर्वोच्च
न्यायालयाने संजय दत्त याला पाच वर्षे शिक्षेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब
केले आणि इकडे सर्व चित्रपट सृष्टी आणि संजय दत्त शी संबंध असलेले सर्व लोक
बेचैन झाले . आणि लगेच या शिक्षे ला राज्यपालांनी त्यांच्या अधिकारात माफी
द्यावी अशी चर्चा संजय च्या निकटवर्तीयांकडून सुरु झालि. आणि त्यासाठी
लॉबिंग साठी प्रसार माध्यमांचा वापर चालू होवून भट्टी गरम झाल्यावर जशी
आपापली पोळी भाजून घेतली जाते तसे सर्वांचे प्रयत्न सुरु झाले आणि प्रत्येक
प्रसार मध्यम वाले आपली बातमी कशी भडक होईल याची खबरदारी घेवून आपापले
कवरेज कसे प्रक्षोभक होईल याची व्यवस्था करण्यात मग्न झाले . पण एक गोष्ट
कोणीही लक्षात घेत नव्हते कि असे करणे कितपत योग्य आहे ?
न्यायमूर्ती काटजू यांनी तर अगदी कहर केला आणि राज्यपालाना पत्र लिहिले सुद्धा !तसे पाहिले तर काटजू याना कोणत्याही वादग्रस्त प्रकरणात आ बैल मुझे मार असे अंगावर ओढवून घेण्याची त्यांची modus operandi आहे असे दिसते.
अमरसिंग, जया बच्चन ,इत्यादी प्रभृतीनी तर राज्यपालांची प्रत्यक्ष भेट घेवून संजय यांच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला माफी द्यावी अशी मागणी केलि. भारतीय संविधानातील उपलब्ध असलेल्या आणि संजय दत्त याने केलेल्या गुन्ह्यांसाठी प्रचलित कायद्याच्या सर्व प्रावाधाना प्रमाणेच सर्व गोष्टींचा अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास करूनच हि शिक्षा दिली गेली आणि या शिक्षेचा सर्वांनी अतिशय आदरपूर्वक स्वीकार करावा हे या सर्व मंडळीकडून अपेक्षित आहे. आणि जर माफी दिली गेली तर हा अतिशय चुकीचा पायंडा पडेल हि गोष्ट सर्वांकडून दुर्लक्षिली जात आहे असे दिसते. अश्या प्रकारे गुन्हेगारांना जर राज्यपाल माफी देव लागले तर न्यायालयाचे महत्व काय राहिले ?
वकिलांनी सरळ राज्यापालाकडेच केस चालवावी आणि त्यांनीच निकाल द्यावा .
दुसरीकडे स्वत: संजय दत्त असे म्हणतो कि हि शिक्षा मला मान्य आहे आणि मी साडेतीन वर्षे जेल मद्धे राहण्यास तयार आहे मग इतर लोकांनी काय म्हणून हि नाटके करावीत ?
आणि या गोष्टीकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही कि १९९३ च्या दंगलीत २५७ निष्पाप लोकांचे प्राण गेले होते. जर जया बच्चन किंवा काटजू तसेच अमरसिंग यांच्या कुटुंबियातील कोणी सदस्य या दुर्दैवी मृतामद्धे असला असता तर अश्या परीस्थित सुद्धा या लोकांची हीच भूमिका राहिली असती काय ?
16 March, 2013
धुलीवंदन
पण कितीही प्रयत्न झाले तरीही शेवटी आकाशाला थोडीच गवसणी घालू शकणार ?
1972 पेक्षाही या वर्षीच्या दुष्काळाची तीव्रता अधिक आहे असे सांगितले जात आहे. अनेक जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे फार मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष्य जाणवत आहे आणि एवढेच नव्हे तर जनावराना देखील पिण्यासाठी पाणी आणि चारा उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी स्थलांतर करून जिथे पाणी आहे अश्या ठिकाणी जात आहेत.
औरंगाबाद येथे पाण्याची अत्यंत कमतरता असताना देखील तेथील बियर च्या कंपन्याना मात्र पाण्याचा कोटा वाढवून मिळाल्याचे दूरदर्शन च्या z चोवीस तास या वाहिनीने आकडेवारी सहित दाखविले आणि विशेष म्हणजे त्यांच्या उत्पादनात अजिबात घट होणार नाही हि काळजी घेतली जाते हे पाहून मनाला वेदना झाल्या.
अजून तर मार्च चे पंधरा दिवस ,एप्रिल चा पूर्ण महिना ,मे चा पूर्ण महिना आणि जून चे पंधरा दिवस असे एकूण तीन महिने या खडतर प्रवासातून जाणे बाकी आहे व हा प्रवास प्रत्येक दिवसागणिक अधिक अधिक खडतर होत जाणार आहे यात काहीच शंका नाहि.
ज्याना जशी मदत करता येईल तशी प्रत्येकाने दुष्काळग्रस्त पिडीताना मदत करावी आणि प्रत्येकाने पाण्याचा वापर खूप जपून करावा कारण यापुढे हि पाणी वरचेवर कमीच होत जाणार असे संकेत भूगर्भ अभ्यासक देत आहेत.
27 मार्च रोजी धुलीवंदन हा सन येत आहे. तरुणाई साठी हा सन म्हणजे रंग खेळून आनंद घेण्याची जणू पर्वणीच असते. मात्र गेल्या काही वर्शामद्धे धुलिवन्दना च्या सणाला काहीसे विकृत स्वरूप येत आहे किंबहुना असे स्वरूप आणणे हि एक प्रकारची फ्याशन बनत चालली आहे. याला कारण म्हणजे या दिवशी होणारा दारू चा वापर.
तरुण मुले आणि मध्यम वयाचे नागरिक सुद्धा या दिवशी दारू,भंग,आणि नशा आणणारे तत्सम जे काही प्रकार असतात आशाचे मोठ्या प्रमाणावर सेवन करतात आणि अतिशय अश्लील भाषेत रस्त्याने मोठ्या आवाजात शिवीगाळ करतात आणि घोषणा देत फ़िरतात. यात अनेक प्रतिष्ठित हि सामील होताना दिसतात आणि आपण काय करतो आहोत याची कुणालाही काहीच लाज वाटत नाही कारण हे सर्व जन असे समजतात कि हा सन म्हणजे अश्या प्रकारच्या कार्या साठी हक्काचा दिवस आहे.
हे सर्व बंद झाले पाहिजे आणि त्यासाठी समाजातील जो काही बुद्धिवादी वर्ग आहे त्यांनी शासनाची तसेच सर्व पक्षातील राजकीय नेत्यांची मदत घेवून आनि तरुण मुलांपैकी जी काही शिक्षित आणि समजदार आहेत अशा सर्वांची एक बैठक घेवून काही तरी विधायक कामामद्धे हा दिवस घालविण्यासाठी प्रयत्न केल्यास काही तरी बदल होवू शकेल.
एकीकडे दुष्काळा मुळे पाण्याचा अत्यंत तुटवडा आणि जर दुसरीकडे आपण रंग उधळण्यासाठी पाणी वापरणे हे कितपत योग्य आहे हे सद्सद्विवेक बुद्धीने ज्याचे त्याने ठरवावे.
01 March, 2013
आपला शेतकरी
शेतकर्या च्या मुलभूत प्रश्नाबाबत आणि त्यांच्या अडचणी बाबत लिहिणारे आणि बोलणारे खूप नेते आहेत पण आजपर्यंत सर्व सामान्य शेतकरी या वर्गाला कुणीच वाली नाही हे दुसरे सत्य
आहे. उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव जो पर्यंत शेतकर्याला मिळत
नाही तो पर्यंत या शेतकर्याला कोणी सुखी पाहू शकणार नाहि.
आज आपण पाहतो कि साध्या टाचणी पासून ,टूथ पेस्ट ,खिळे ,नट बोल्ट ,इत्यादि इत्यादी वस्तू पासून मोठया उत्पादनाकडे पहा प्रत्येकाला आपण उत्पादित केलेल्या वस्तूचे उत्पादन खर्च लावून त्यांवर आपला नफा लावून आणि त्या वस्तूंवर किमत सुद्धा छापण्याची मुभा आहे त्यामुळे सर्वाना त्यांचा नफा निश्चित मिळण्याची हमी आहे. पण जगाच्या पाठीवर केवळ भारतीय शेतकरी हा एकच घटक असा आहे कि याने वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस राब राब राबायचे आणि कष्टातून मिळालेल्या उत्पादनाचा भाव मात्र ठरविण्याचा हक्क यां दुर्दैवी घटकाला मुळीच नाहि. हा काय न्याय आहे ?
अनेकाना शेतकर्याबद्दल सहानुभूती आहे ,अनेक जन त्यावर लिहितात सुद्धा. पण न्याय देण्यासाठी ठोस कार्य करणारे कोणीच नाहि ?
मी स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या सर्व वेदना ,व्यथा मी समजू शकतो आणि स्वत: सुद्धा अनुभवतो. पण करणार काय ?
कधी कधी मनाचा खूप उद्वेग होतो ,मन संवेदनशील असल्यामुळे मनाला या गोष्टींमुळे वेदना होतात पण या निगरगट्ट आणि भ्रष्टाचाराणे बरबटलेल्या राजकीय नेत्यांना शेतकर्या साठी दयेचा पाझर कधी फुटेल हे आपण कसे सांगू शकणार ?
आज आपण पाहतो कि साध्या टाचणी पासून ,टूथ पेस्ट ,खिळे ,नट बोल्ट ,इत्यादि इत्यादी वस्तू पासून मोठया उत्पादनाकडे पहा प्रत्येकाला आपण उत्पादित केलेल्या वस्तूचे उत्पादन खर्च लावून त्यांवर आपला नफा लावून आणि त्या वस्तूंवर किमत सुद्धा छापण्याची मुभा आहे त्यामुळे सर्वाना त्यांचा नफा निश्चित मिळण्याची हमी आहे. पण जगाच्या पाठीवर केवळ भारतीय शेतकरी हा एकच घटक असा आहे कि याने वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस राब राब राबायचे आणि कष्टातून मिळालेल्या उत्पादनाचा भाव मात्र ठरविण्याचा हक्क यां दुर्दैवी घटकाला मुळीच नाहि. हा काय न्याय आहे ?
अनेकाना शेतकर्याबद्दल सहानुभूती आहे ,अनेक जन त्यावर लिहितात सुद्धा. पण न्याय देण्यासाठी ठोस कार्य करणारे कोणीच नाहि ?
मी स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या सर्व वेदना ,व्यथा मी समजू शकतो आणि स्वत: सुद्धा अनुभवतो. पण करणार काय ?
कधी कधी मनाचा खूप उद्वेग होतो ,मन संवेदनशील असल्यामुळे मनाला या गोष्टींमुळे वेदना होतात पण या निगरगट्ट आणि भ्रष्टाचाराणे बरबटलेल्या राजकीय नेत्यांना शेतकर्या साठी दयेचा पाझर कधी फुटेल हे आपण कसे सांगू शकणार ?
Subscribe to:
Posts (Atom)