Powered By Blogger

25 May, 2013

क्रिकेट मधील फिक्सिंग आणि प्रेक्षक

I P L ची फिक्सिंग नुकतीच उजेडात आलेली आपण म्हणजेच सर्व क्रिकेट प्रेमींनी वर्तमान पत्रातून आणि दूरदर्शन वर पहिलीच असेल. किती हे पैशासाठी नैतिक अध:पतन म्हणायचे ?
आपण प्रत्यक्ष तिकीट काढून सामना पाहणारे प्रेक्षक आणि दूरदर्शन वर सामना पाहणारे जगाच्या पाठीवरील करोडो प्रेक्षक या सर्वांची कीव करावीशी वाटते कारण किती आत्मियतेने आणि उत्कंठा पूर्वक आपण दुसरी अनेक कामे सोडून सामना पाहतो आणि हे हरामखोर खेळाडू आपले इमान पैशासाठी विकून आपल्याला सरळ सरळ उल्लू बनवतात !
सर्व प्रेक्षकांनी उच्च न्यायालयात I P L सामन्यांचे खेळाडू,आयोजक,टीम चे मालक आणि या सर्वाना परवानगी देणारे शासन या सर्वांवर फसवणुकीची याचिका दाखल करावी आणि सर्व प्रेक्षकांचा अत्यंत असा बहुमुल्य वेळ वाया घालविल्याबद्दल आणि फिक्सिंग उघडकीला आल्यावर झालेल्या मानसिक त्रासाबद्दल मोठी किमत वसूल करण्यासाठी दावा दाखल करण्यासाठी कायदा तज्ञांची सल्लामसलत करावी असे वाटते आणि यापुढे होणार्या सामन्यांवर स्टे मिळण्यासाठी सुद्धा दुसरा खटला दाखल करावा कारण कशावरून पुढील सामान्यामाद्धे फिक्सिंग होणार नाही ?
या सर्व सामन्यातील गुंतलेले सर्व लोक करोडो रुपयांची माया अगदी सहजतेने गोळा करत आहेत आणि बिच्चारे प्रेक्षक केवळ हात चोळत बसलेत अगदी हतबल होवून ! जागे व्हा क्रिकेट रसिकानो ,जागे व्हा आणि काही तरी करा या धनदांडग्या आणि  क्रिकेट च्या दुकानदारांविरुद्ध !
आपण जेव्हा पाहत आहोत कि BCCI चे अध्यक्ष श्रीनिवासन यांचे जावई मय्यप्पन हे स्वत: या फिक्सिंग मद्धे गुंतलेले आहेत आणि तपास जसाजसा पुढे सरकत आहे तसेतसे नवीन मोठे मोठे मासे दररोज गळाला लागत आहे आणि हि लिंक  टीम च्या मालकांपर्यंत  पोचण्याची शक्यताही नाकारता येत नाही असे असतानाही जर प्रेक्षक सामने पाहण्याची हौस करीत असतील तर या सर्व फिक्सिंग ला पर्यायाने मोठ्या भ्रष्टाचाराला प्रेक्षकांची मूक समती आहे असे गृहीत धरण्यास हरकत नाहि. कारण दररोज उघडकीस येणारे घोटाळे,अनेक भ्रष्टाचारांची प्रकरने हे फारच अंगवळणी पडल्यामुळे कि काय कोणालाच काही गांभीर्य वाटेनासे झाले आहे . मात्र एक मात्र खरे आहे कि क्रिकेट च्या सर्व प्रेक्षकांनी सामनाच पहायचा नाही असे जर ठरविले तर मात्र या सर्व बड्या धेंडांची एका क्षणात गोची होवू शकते हे काळ्या दगडावरची रेघ आहे. एक वेळ सर्व प्रेक्षकांनी हा प्रयोग करून पहावाच असे मनापासून वाटते.
                                                 महादेव विश्वनाथ कापुसकरी
                              
                   एक क्रिकेटप्रेमी

1 comment:

Anonymous said...

जाऊ द्या हो साहेब, हे सामने काही देशाभिमानासाठी खेळले जात नाहीत (ह्यांच्या पेक्षा ३ दिवसांचे रणजी क्रिकेट तरी बरे) आणि ते पाहणे हे ख-या कष्टक-याचे काम नव्हते त्यामुळे बहुतेक जण त्याकडे ढुंकूनही पहात नव्हते (त्यांच्या साठी सरकारने फिक्स केलेली महागाईच एक मोठा सामना आहे), तर सामने पहाणारा मुठभर प्रेक्षक वर्ग आहे तोच सध्या बसलाय कोकलत कारण त्यांच्याकडे एकतर वेळ आणि कमाई ठीक असते आणि बुडाला खाज ही असते. तरी त्यांनी सुद्धा गळे काढू नये कारण सामने तर पाहिले ना. ते फिक्स होते की नाही ते त्यांचे त्यांनी पहावे कारण फिक्सिंगचे प्रकार १० वर्षांपूर्वीच उघडकीस आले आहेत तेव्हा हा खेळ तसा काही सोज्वळ राहिलेला नव्हताच. शिवाय सामने पहाणा-या प्रत्येकाने सट्टा लावला नव्हता म्हणजे त्यांचे नुकसान ते काय फार मोठे नाहि. हल्ली बिग बजेट सिनेमे मोठा गाजा वाजा करत येतात आणि हजारची एक पत्ती घेऊन ३ तासाचा वेळ घालवून डोक्याला ताप देतात त्याविषयी कोणी ओरडत नाही.

खरी ओरड त्यांनी करावी ज्यांनी यात मोठा सट्टा खेळलाय आणि हात जाळून घेतले. ते तर चिडी चूप आहेत तर मग सामान्य प्रेक्षकांनी गळा न काढणेच उत्तम.