पण कितीही प्रयत्न झाले तरीही शेवटी आकाशाला थोडीच गवसणी घालू शकणार ?
1972 पेक्षाही या वर्षीच्या दुष्काळाची तीव्रता अधिक आहे असे सांगितले जात आहे. अनेक जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे फार मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष्य जाणवत आहे आणि एवढेच नव्हे तर जनावराना देखील पिण्यासाठी पाणी आणि चारा उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी स्थलांतर करून जिथे पाणी आहे अश्या ठिकाणी जात आहेत.
औरंगाबाद येथे पाण्याची अत्यंत कमतरता असताना देखील तेथील बियर च्या कंपन्याना मात्र पाण्याचा कोटा वाढवून मिळाल्याचे दूरदर्शन च्या z चोवीस तास या वाहिनीने आकडेवारी सहित दाखविले आणि विशेष म्हणजे त्यांच्या उत्पादनात अजिबात घट होणार नाही हि काळजी घेतली जाते हे पाहून मनाला वेदना झाल्या.
अजून तर मार्च चे पंधरा दिवस ,एप्रिल चा पूर्ण महिना ,मे चा पूर्ण महिना आणि जून चे पंधरा दिवस असे एकूण तीन महिने या खडतर प्रवासातून जाणे बाकी आहे व हा प्रवास प्रत्येक दिवसागणिक अधिक अधिक खडतर होत जाणार आहे यात काहीच शंका नाहि.
ज्याना जशी मदत करता येईल तशी प्रत्येकाने दुष्काळग्रस्त पिडीताना मदत करावी आणि प्रत्येकाने पाण्याचा वापर खूप जपून करावा कारण यापुढे हि पाणी वरचेवर कमीच होत जाणार असे संकेत भूगर्भ अभ्यासक देत आहेत.
27 मार्च रोजी धुलीवंदन हा सन येत आहे. तरुणाई साठी हा सन म्हणजे रंग खेळून आनंद घेण्याची जणू पर्वणीच असते. मात्र गेल्या काही वर्शामद्धे धुलिवन्दना च्या सणाला काहीसे विकृत स्वरूप येत आहे किंबहुना असे स्वरूप आणणे हि एक प्रकारची फ्याशन बनत चालली आहे. याला कारण म्हणजे या दिवशी होणारा दारू चा वापर.
तरुण मुले आणि मध्यम वयाचे नागरिक सुद्धा या दिवशी दारू,भंग,आणि नशा आणणारे तत्सम जे काही प्रकार असतात आशाचे मोठ्या प्रमाणावर सेवन करतात आणि अतिशय अश्लील भाषेत रस्त्याने मोठ्या आवाजात शिवीगाळ करतात आणि घोषणा देत फ़िरतात. यात अनेक प्रतिष्ठित हि सामील होताना दिसतात आणि आपण काय करतो आहोत याची कुणालाही काहीच लाज वाटत नाही कारण हे सर्व जन असे समजतात कि हा सन म्हणजे अश्या प्रकारच्या कार्या साठी हक्काचा दिवस आहे.
हे सर्व बंद झाले पाहिजे आणि त्यासाठी समाजातील जो काही बुद्धिवादी वर्ग आहे त्यांनी शासनाची तसेच सर्व पक्षातील राजकीय नेत्यांची मदत घेवून आनि तरुण मुलांपैकी जी काही शिक्षित आणि समजदार आहेत अशा सर्वांची एक बैठक घेवून काही तरी विधायक कामामद्धे हा दिवस घालविण्यासाठी प्रयत्न केल्यास काही तरी बदल होवू शकेल.
एकीकडे दुष्काळा मुळे पाण्याचा अत्यंत तुटवडा आणि जर दुसरीकडे आपण रंग उधळण्यासाठी पाणी वापरणे हे कितपत योग्य आहे हे सद्सद्विवेक बुद्धीने ज्याचे त्याने ठरवावे.
No comments:
Post a Comment