30 September, 2008

मिडियाची वादातीत भूमिका

आज स्टार माझा वरील बातम्यामद्धे शिवाजी महाराजानच्याविशायी शासनाने अपमानकारक मजकुर आहवालातलिहिला असल्याचे दाखविले गेले महाराष्ट्रातील काही राजकीय लोकांना दररोज आशा प्रकारचे नविन नविन वादनिर्माण करून त्यातून आपली पोली कशी भाजून घ्यायची यापेक्षा दुसरे काहीही घेणे देने नसते। सामान्य लोकांनाआपल्या कामातून इतरत्र लक्ष वेधले गेल्याची जाणीव होते मात्र तो पर्यंत उशीर झालेला असतो आणि बरेचसे कामबुडालेले असते। आज च्या वेगवान,संगणकीय युगात केवल भावनाविवश करून किंवा होउन चालत नाही तरकाहीतरी क्रियेटिव करून दाखविले गेले तर ते अधिक चांगले असेल। कोणत्याही निरर्थक विषयांवर कितीहीकव्हरेज देने मिडियानेही टालले पाहिजे परन्तु आज आपण पाहतो की भड़क बातम्या देणारी वृत्तपत्रे हातोहातखपतात आणि दर्जेदार व् माहितीपूर्ण लेख असलेली दैनिके विशिष्ट वर्गातच लोकप्रिय ठरतात .ही परिस्थितिबदलली पाहिजे आणि ही परिस्थिति बदलण्यासाठी तरुनानी पुढाकार घेउन विधायक द्रष्टिकोनातुंन स्वछ मनानेपुढे सर्साव्ल्यास भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न साकार होण्यास अधिक वेळ लागणार नाही असे वाटते.

No comments: