I P L ची
फिक्सिंग नुकतीच उजेडात आलेली आपण म्हणजेच सर्व क्रिकेट प्रेमींनी वर्तमान
पत्रातून आणि दूरदर्शन वर पहिलीच असेल. किती हे पैशासाठी नैतिक अध:पतन
म्हणायचे ?
आपण प्रत्यक्ष तिकीट काढून सामना
पाहणारे प्रेक्षक आणि दूरदर्शन वर सामना पाहणारे जगाच्या पाठीवरील करोडो
प्रेक्षक या सर्वांची कीव करावीशी वाटते कारण किती आत्मियतेने आणि उत्कंठा
पूर्वक आपण दुसरी अनेक कामे सोडून सामना पाहतो आणि हे हरामखोर खेळाडू आपले
इमान पैशासाठी विकून आपल्याला सरळ सरळ उल्लू बनवतात !
सर्व प्रेक्षकांनी उच्च न्यायालयात I P L
सामन्यांचे खेळाडू,आयोजक,टीम चे मालक आणि या सर्वाना परवानगी देणारे शासन
या सर्वांवर फसवणुकीची याचिका दाखल करावी आणि सर्व प्रेक्षकांचा अत्यंत असा
बहुमुल्य वेळ वाया घालविल्याबद्दल आणि फिक्सिंग उघडकीला आल्यावर झालेल्या
मानसिक त्रासाबद्दल मोठी किमत वसूल करण्यासाठी दावा दाखल करण्यासाठी कायदा
तज्ञांची सल्लामसलत करावी असे वाटते आणि यापुढे होणार्या सामन्यांवर स्टे
मिळण्यासाठी सुद्धा दुसरा खटला दाखल करावा कारण कशावरून पुढील
सामान्यामाद्धे फिक्सिंग होणार नाही ?