13 May, 2011
IPL CRICKET
IPL क्रिकेट बद्दलबोलाल तेवढकमीच आहें.कालचवर्तमानपत्रातबातमी आली किनांदेड येथे IPL क्रिकेट वर satta सुरु असतानापोलिसांनी काहीप्रतीष्ठीताना अटकझाली.आणि लाखोरुपये जप्त करण्यात आले.केवळ २०-२० ओवर्स च्या या सामन्यासाठी लोकांचे ( सामान्य जनतेचे ) किती पैसेजातात आणि या सामन्याचे संयोजक आणि तसेच या सामन्यांमद्धे खेळत असलेल्या संघांचे मालक किती रुपयेकमावतात हि आकडेवारी पाहिल्यास आपणास थक्क होण्याची वेळ येईल.माझी लोकमत ला विनंती आहें कि याआकडेवारीची सखोल चौकशी करून जनतेपुढे आणावी म्हणजे आपले क्रिकेट वेड हे कोणाचे खिसे भरत आहें यागोष्टीची जाणीव सामान्य क्रिकेट प्रेमीना होईल आणि त्यांचे डोळे उघडतील.
नीता अंबानी,प्रीती झिंटा,विजय मल्ल्या,शाहरुख किंवा अजून जे कोणी हे मालक लोक आहेत त्यांनी कधीमेळघाटातील कुपोषित बालके पाहिली आहेत?
ग्रामीण भागातील शेतकर्याना किती अवघड परिस्थितीतून जावे लागते हे त्यांनी कधी पाहिले आहें?
झोपडपट्टीतील असंख्य लहान बालके आपले बालपण विसरून जीवाला न झेपणारी कामे करतात हे या लोकांनीपाहिले आहें काय ?
उकीर्ड्यावरील अन्नाचे कन शोधणारी भिकाऱ्यांची लहान बालके या लोकांनी कधी पाहिली आहेत?
चौकार ,षट्कार मारला कि आपल्या उघड्या मांड्या दाखवीत नाचणार्या cheer girls ला लालचावनार्या नजरेनेन्याहालाण्यार्या प्रेक्षकाना तरी जाणीव व्हावी कि आज आपण हजारो रुपयांचे तिकीट काढून हा सामना बघतआहोत पण खिसे कोणाचे भरत आहोत व किती भरत आहोत?
त्या पेक्षा वर उपस्थित केलेल्या दुर्बल घटकांसाठी जर काही करता आले तर बरेच काही सार्थक होईल.
पण लक्षात कोण घेतो ?
महादेव विश्वनाथ कापुसकरी
Basmatnagar जी. हिंगोली.
मो .9423141008
04 May, 2011
दुर्दैवी निर्णय
सत्य साईच्या प्रशांती नीलयम आश्रमात साई कुलवंतसभागृहात त्यांचा पुतळा उभारण्यासाठी सचिन तेंडूलकरयाने तीस लाख रुपये खर्च करून त्यावर सोन्याचा मुलामादेण्याचाही खर्च करण्याची जवाबदारीही त्याने स्वीकारलीआहे असे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले आहे.
मी व्यक्तीशः सचिन तेंडूलकर चा चाहता आहे.आणि त्याचामला अत्यंत आदर आहें.मात्र पुतळ्याबद्दल खर्च करण्याचात्याचा निर्णय दुर्दैवी आहे असे मला वाटते.त्यापेक्षा त्यानेएखाद्या बुद्धिमान परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी खर्च करावेत किंवामेळघाटातील कुपोषित बालकांच्या पोशनाचा खर्च करणारया एखाद्या सेवाभावी संस्थेला देणगी म्हणून द्यावेतकिंवा ग्रामीण भागातील गरीब महिलांसाठी मोफत प्रसुतिग्रह काढण्यासाठी किंवा ग्रामीण भागातीलबालकामगाराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खर्च करावेत.अर्थात हि लांबलचक यादी लिहिण्यामागे सचिनची श्रद्धा दुखावण्याचा मुळीच उद्देश नाही.परंतु एवढ्यासाठीच वाटते कि अत्यंत श्रीमंत असलेल्या या trust ला पैसेदेण्यापेक्षा ज्याना पैशाची अत्यंत निकड आहे अशाच सामाजिक संस्थेकडे हा ओघ जावा हि प्रामाणिक भावनाआहे.
महादेव विश्वनाथ कापुसकरी
बसमत्नगर जी.हिंगोली
मो .9423141008
Subscribe to:
Posts (Atom)