Powered By Blogger

07 August, 2010

भारतासाठी लाजिरवानी गोष्ट




केन्द्रीय मनुष्यबल विकास मंत्री श्री कपिल सिब्बल यानीराज्यसभेत कबूल केले की देशात तब्बल १२ लाख शिक्षकाच्या जागा रिक्त आहेत .ही अतिशय लाजीरवानी बाबआहे.आज देशाचे पंतप्रधान एकीकडे सांगतात की देशाचा आर्थिक विकासदर वाढला आहे आणि महागाई दर घटलाआहे.भारत हा जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे।
मात्र ज्या देशात शिक्षकाच्या १२ लाख जागा जर रिक्त असतील त्या देशाने जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्नकशाच्या आधारावर पहावे?


ग्रामीण भागातही बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणावर आहे मात्र त्याना दिशा देणारे शिक्षण उपलब्ध नाही जे उपलब्धआहे ते इतके महागडे आहे की सामान्य माणसाच्या आर्थिक क्षमतेच्या बाहेर आहे।
एकीकडे आर्थिक विकास दर वाढीच्या चर्चा हॉट असतानाच दुसरीकडे कृषि प्रधान असलेल्या भारतात ख़त विकतघेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या शेताकर्यावर शासनाचे नोकर असलेले पोलिस गोळ्या झाडतात,लाठीचार्जकरतात ही केवढी विसंगति आहे?
स्वातंत्र्य मिळून आज सहा दशके होउन गेली आहेत परन्तु शेताकर्याना त्याना पाहिजे असलेले ख़त पुरविन्यासशासन असमर्थ ठरत आहे आणि तिकडे विकासदर वाढला आहे असे रोज वर्तमानपत्रात छापून येते।
ज्या शेतकर्याच्या कश्तातुन,त्याने रक्त आटवून केलेल्या मेहनतिमुले देशाच्या राष्ट्रिय उत्पन्नात वाढ होते
त्याच्या नशिबी पोलिसांचा लाठीचार्ज,गोलीबार? ही कसली लोकशाही?
ख़त दुकानदार वातानुकूलित केबिन मद्धे फिरत्या खुर्चीवर बसून संगणकावर गेम खेलत बसतो आणि इकडेबिचारा शेतकरी आपल्या सर्व कुटुम्बियाना घेवुन उन्हातान्हात रांगेत उभा कारण की प्रत्येकी एक पोते मिलणारअसल्यामुले तर आपल्याला पाच पोते तरी मिलतिल ही आशा ...
किती ही कुचम्बना?


प्रमाणिकपणे मेहनत करुनसुद्धा tयाच्या नशिबी अशी हाल अपेश्ता जगाच्या पाठीवर इतरत्र कोठेही नसेल !


काय तर कृषिप्रधान देश!!!!!!!


वा रे लोकशाही..............



महादेव विश्वनाथ कापुसकरी


बसमथनगर जी.हिंगोली.
मोब.९४२३१४१००८


mvkapuskari@gmail.com



1 comment:

Arshat Chaudhary said...

khupch chaan post aahe... thank you for this post...