दहावी तसेच बारावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एटिकेटी ची योजना लागू करण्याचा शासनाचानिर्णय अत्यंत घातक असून सर्व स्तरातून याचा विरोध केला गेला पाहिजे आणि या निर्णयाचाफेरविचार करण्यासाठी शासनाला भाग पाडले गेले पाहिजे.या निर्णयातून अनेक प्रकारे शैक्षणिकनुकसान होण्याची शक्यता आहे.1) प्रत्येक विद्यार्थ्याला दोन विषय गेले तरीही अकराविच्या वर्गातप्रवेश निसचित असल्यामुळे अभ्यासाविषयी कोणतेही गांभीर्य राहणार नाही.त्यामुळे निकाल घसरेल.2) अकराविच्या प्रवेशासाठी एटिकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची एकच गर्दी होईल व त्याचा फायदा संस्थाचालकअवाच्यासवा फीस आकारून त्यांचे आर्थिक शोषण करतील.3)मागील काही वर्षात सरकारने कायम वीणाअनुदानीत तत्वावर अनेक संस्थाना कनिष्ठ महाविद्यालये खिरापटवाटल्याप्रमाणे वाटली आहेत.त्याची यादीपाहिल्यास असे दिसेल की सत्ताधारी नेते तसेच अनेक राजकीय शिक्षणसम्राट हेच अशा माविद्यालयांचे चालकआहेत असे चित्र दिसेल.आपल्याच लोकांची तुंबाडी भरण्यासाठीच हा घातक निर्णय घेतला आहे असे दिसते.4) यासर्व विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी जे प्राध्यापक लागतील त्यांच्याकडून नेमणूकातुन होणारी प्राप्ती ही वेगळीचअसेल हे वेगळे सांगण्याची काहीच आवश्यकता नाही.5)एटिकेटी व गुणवत्ताधारक विद्यार्थी एकाच वर्गातबसविल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यतानाकारता येत नाही.6) एकंदरीत शिक्षणाचादर्जा घसरल्यामुळे पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणार्या मुलांची संख्या घटू शकते. महादेव विश्वनाथअप्पाकापुसकरी बसमतनगर जी.हिंगोली. मोबा -9423141008
13 July, 2009
06 July, 2009
मायावतीची मायानगरी
मायावती यानी राज्यात स्वतहाचे पुतळे उभारण्यासाठी काही कोटी रुपये खर्चकरण्याचा ठराव पारीत केल्याचे वाचून अशा प्रकारच्या खर्चाना केंद्राकडून काहीनिर्बंध असावेत व सध्या जर अस्तित्वात नसतील तर तसा कायदा करण्याचीगरज आहे असे वाटते. जग आज मायक्रो कडून ण्यानो कडे जात आहे तसेचसंगणकीय जगात आज भारताचे संगणक इंजिनीयर आपले वर्चस्व सिद्ध करीतआहेत आणि दुसरीकडे हे नेते आपले पुतळे उभारण्यात कोट्यावधी रुपये अनाठायीखर्च करीत आहेत ही गोष्ट अत्यंत विसंगत आहे. विद्यापीठे,महाविद्यालये,शाळा,रुग्णालये,गरीब लोकांसाठीरोजगाराच्या योजना यासाठी आज निधी वापरला जाण्याची गरज असताना जर पुतळ्यासाठी पैसे वापरले जातअसतील तर केवळ राज्यातील च नव्हे तर सर्व देशातील सामाजिक संस्था , समाज सेवक,लोकप्रतिनिधी,तसेचराज्यपाल,राष्ट्रपती,पंतप्रधान ,निवडणूक आयोग इत्यादिणी या प्रकरणी योग्य लक्ष घालून हा पैशाचा गरवापररोखला पाहिजे असे वाटते. महादेव विश्वनाथ कापुसकरी बसमतनगर जी.हिंगोली मोबा - 9423141008
Subscribe to:
Posts (Atom)