आपण पहात आहोत की गेले ९-१० दिवस सातत्याने उपोषण करूनही
या वेळेस जनतेने ,मिडीया ने आणि सरकारने सुद्धा याची फारशी दाखल घेतली नाही
आणि हे उपोषण केवळ निश्क्रीयच नव्हे तर सर्वांसाठी एक देखावाच ठरले अर्थात
या उपोशनातील काही मागण्या जरी महत्वपूर्ण वाटत असल्या तरीही केवळ टीम
अण्णा नेच या साठी पाठपुरावा करावा आणि इतर सर्व जनतेने केवळ तमाशा बघावा
हे कोणत्याही सुज्ञ नागरिकास नक्कीच रुचणारे नाही त्यासाठी देशभरातून
भरभरून प्रतिसाद मिळावयास हवा जो की मिळाला नाही आणि मिळणारही नाही कारण आज
च्या वेगवान जीवनात या प्रश्नावर विचार करायला कोणाला वेळ आहें ? आणि किती
टक्के बुद्धीजीवी लोक या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करतात याचा जर
सर्वे केला तर नक्कीच निराशाजनक आकडेवारी हाती येयील.मात्र एक गोष्ट नक्कीच
खटकण्यासारखी आहें ती म्हणजे अण्णांचा नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय !
सध्याच्या जमान्यात निवडणुकीत यशस्वी होणे हे अन्नासार्ख्या व्यक्तीला
किंवा त्यांनी काढलेल्या पक्षाला शक्य होईल असे मुळीच वाटत नाही.कारण आज
आपण पाहतो निवडणुकीत ज्या मार्गांचा वापर केला जातो त्या मार्गाने टीम
अण्णा चे सहकारी जावूच शकत नाहीत कारण तो मार्ग अनैतिक आहें आणि निवडणूक तर
केवळ नैतिक मार्गाने आणि प्रामाणिकपणे जिंकली जाउच शकत नाही हे एक
निर्विवाद सत्य आहें असे वाटते.जेष्ठ समाजसेविका मेघा पाटकर यांनी मात्र
अण्णाना एक चांगला सल्ला दिला आहें की नवीन पक्ष स्थापनेपूर्वी हजार वेळा
विचार करा हा अतिशय समर्पक वाटतो अण्णांनी जरूर विचार करावा आणि जेवढा
तमाशा झाला तिथेच संपवावा असे प्रामाणिकपणे वाटते.