Powered By Blogger

18 March, 2011

हसन अली " The Great "


मार्च २००७ मध्ये हसन आली याच्या पुणे येथील निवासस्थानी आयकरखात्याचीधाड पडली होती आणि त्यावेळेस तो एक रेस च्या घोड्यांचाव्यापारी असूनत्याचेकडे त्यावेळेस जवळपास ३५००० कोटी रुपयांचीमालमत्ता,प्रत्येकी एककोटी रुपये किमतीचे ४० रेस चे घोडे आणि स्विसबँकेत त्याच्या मालकीची १०खाती असे विवरण वर्तमानपत्रात छापूनआले होते.दैनिक सकाळ च्या दि.१३-३-२००७ रोजीच्या अंकात ई-पत्रे यासदरात " मोठ्यामाशाची जादू!"या मथळ्याखाली मी लिहिले होते कि मला या महान माणसाचा हेवावाटतो कारणलहान शहरातून छोटा मोठा व्यापार व्यवसाय करणारया वप्रामाणिकपणे प्राप्तीकर भरणार्या व्यापारयांवर अनेकदाप्राप्तीकरखात्याची वक्रद्रष्टी पडते आणि प्राप्तीकर खात्याकडून अधिकार्यांनादिलेल्या टार्गेट चे या व्यापार्यांना बळीव्हावे लागते. मात्र यापार्श्वभूमीवर हसन आली सारखे मोठे मासे काय जादू करतात कोणास ठाऊक!हसन अलीच्यामालमत्तेचे आकडे सामान्य माणसाला अचंबित करून तोंडात बोटघालायला लावणारे आहेत.२००७ मधील हिअघोषित मालमत्ता होती तर त्यावेळेसपासून ते २०११ पर्यंत प्राप्तीकर खाते काय करत होते हाही एकसंशोधनाचाविषय नव्हे काय ?आज आता ऐकलेल्या बात्म्यामध्ये असे समजले कि पुराव्या अभावी हसन आलीयाचीकोर्टाने जमानातीवर मुक्तता केली .वा रे प्राप्तीकर संचालनालय ....धन्य तो हसन आली आणि धन्य तोकायदा.......आजचे त्याच्या मालमत्तेचे आकडे ऐकल्यावर फोर्ब्स च्या यादीत त्याचे नावकसे काय नाही असेवाटल्यावाचून रहात नाही.तो ज्या सेक्टर मध्ये राहतो त्या सेक्टर मधील सर्व प्राप्तीकरअधिकार्यांशी हसन आली चेकाय संभंध आहेत हि गोष्ट तपासून पाहण्यासाठीअण्णा हजारेनाच पुढे यावे लागेल कारण दुसरया कोणाचेही वजनपडत नाही. Mahadev Kapuskari Basmathnagar Mob. 9423141008