Powered By Blogger

30 July, 2011

भारतरत्न पुरस्कार आणि सचिन तेंडूलकर

सचिन ला इतक्यातच भारतरत्न पुरस्कार देणे योग्य आहें का? हा प्रश्न आपण उचलला याबद्दल आपले अभिनंदन.
कारण कि मनातून कितीही वाटत असले तरीही याबाबत असलेल्या राजकीय दबावामुळे आणि भीती पोटी कोणीहीबोलायला तयार नाही.
खरे तर क्रिकेट हा खेळ भारतीय प्रेक्षकांनी वाजवीपेक्षा जास्त लोकप्रिय केला आहें हे माझे मत.
या खेळात प्रसिद्धी आणि पैसा दोन्हींचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त आहें.
त्यामानाने जागतिक पातळीवरील प्रथम क्रमांकाचे गुणांकन मिळालेले विश्वनाथन आनंद ,गीत सेठी,हॉकी तीलध्यानचंद,या लोकाना घ्यायला देखील विमानतळावर कोणी जात नाही आणि क्रिकेट चे खेळाडू मात्र इतके लाडकेकि पोलीस बंदोबस्तात आणि पत्रकारांच्या गराड्यात ,दूरदर्शन चे क्यामेरे आणि त्यांचे खटाखट flash हे कितीविसंगत आणि इतर खेळांवर अन्याय करणारे नव्हे काय?
जेव्हा सचिनला भारतरत्न देण्याविषयी चर्चा होते तेव्हा काय वाटत असेल विश्वनाथन आनंदला ?
मी तर असे म्हणेन कि हे सर्व सचिन ने स्वत: होवून थांबवायला हवे आणि नम्रपणे हा पुरस्कार मला देवू नये असेसांगायला हवे.
सचिन ची कामगिरी खूप मोठी आहें आणि देशासाठी त्याचे योगदान मोठे आहें यात कसलेही दुमत नाही.पणभारतरत्न हा पुरस्कार काही लहान नाही.कि इतक्या सहजपणे आणि मुद्दाम एका व्यक्तीसाठी घटनेत दुरुस्ती करूनइतकी घाई करून गडबडीने पुरस्कार देण्याचा घाट घातला जातोय.
मला असे वाटते कि घटनाच बदलायची असेल तर कसाब ला फाशी देण्यासाठी बदला ,भ्रष्टाचार करणारया राजकीयआणि बड्या पांढरपेशा गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी बदला.कलमाडी सारखे नेते डॉक्टर आणि बडे वकील यांच्यासाह्याने स्मृतीभांश झाल्याचे नाटक करीत आहें आणि बिचारी भारतीय जनता निर्विकार पने हे सर्व प्रकार ऐकूनघेतेय.येथे घटना का बदलत नाहीत?
करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराने बरबटलेले k .राजा,कानिमोझी सारख्या नेत्यांना फासावर चढविण्यासाठी घटनाबदला.
खरोखरच सामान्य जनता आनंदित होईल.आणि हे सर्व करण्यासाठी घाई काही नाही पण सचिन ला भारतरत्न मात्रलवकरात लवकर मिळाला पाहिजे असे हे राजकारण किती दिवस चालणार?
· · Share · Delete





04 July, 2011

मंदिरातील खजिना

भारतातील अनेक मंदिरातील अश्या प्रकारच्या खजिन्याचा काय उपयोग ?
हा सर्व खजिना जर भारतातील अर्थव्यवस्थेत समाविष्ट झाला तर देशातील सर्व गरीब आणि दारीद्र्यारेशेखालीलहोतकरू बुद्धिमान तरुणांना आपण उच्च शिक्षण देवू शकू.विशेषता:ग्रामीण भागातील अनेक शेतकरी असंख्यप्रकारच्या अडचणींचा सामना करीत आहेत त्यांच्या मदतीसाठी हा खजिना कमी येत असेल तर आज भारत देशहा जागतिक महासत्ता बनू शकतो.
माझ्या मते अश्या प्रकारच्या मंदिरान्मद्धे दान करणारे सामान्य नागरिक मूर्ख ठरत आहेत .आज आपण पाहतोसाई मंदिरातील पैसा बाहेर जात असताना अनेकवेळा पकडला गेला आणि त्याचा खुलासा विश्वस्त देवू शकलेनाहीत.एकंदरीत लोकांनी दिलेल्या पैश्याचा विनियोग कसा होतोय हे पारदर्शक असले पाहिजेत.नसता सर्व पैसाराष्ट्रीय संपत्ती म्हणून वापरला गेला पाहिजे पण तेथेही भ्रष्टाचार विरहित कारभार असला तरच उपयोगआहें.